Ajit Pawar Local Body Election : अजितदादांना होमग्राउंडवर घेरण्याची तयारी, महाविकास आघाडीला मनसेच्या इंजिन बळ!
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ajit Pawar Local Body Election : राज्यात महाविकास आघाडीसोबत मनसे जाणार का, याची चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे एका स्थानिक निवडणुकीत महाविकास आघाडीला मनसेच्या पाठिंब्याचे बळ मिळाले आहे.
पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची राजकीय समीकरण जुळवण्याची तयारी सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यातील काही ठिकाणी स्थानिक समीकरणांच्या अनुषंगाने नवीन राजकीय समीकरणं, आघाडी तयारी होण्याचे संकेत दिसू लागले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात घेरण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडीसोबत मनसे जाणार का, याची चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे एका स्थानिक निवडणुकीत महाविकास आघाडीला मनसेच्या पाठिंब्याचे बळ मिळाले आहे.
advertisement
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे वेगाने बदलत असताना आता महाविकास आघाडीनंही आपली रणनीती स्पष्ट केली आहे. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युतीनंतर महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे एकत्रितपणे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. या आघाडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
advertisement
गुरुवारी, या चार पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आघाडीची भूमिका जाहीर केली. नगर परिषदेच्या एकूण १४ प्रभागांतील २८ जागांसाठी महाविकास आघाडी संयुक्त उमेदवार उभे करणार असून नगराध्यक्ष पदासाठीही आघाडी एकच उमेदवार देणार आहे.
तळेगाव दाभाडेतील निवडणुकीला यामुळे नवा कलाटणी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) युतीला थेट उत्तर म्हणून महाविकास आघाडीची ही एकजूट समोर आली असून, स्थानिक राजकारणात विजयी समीकरण कोण तयार करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र?
भाजपला शह देण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. आघाडीचा हा कोल्हापुरी पॅटर्न पिंपरीत दिसण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वात श्रीमंत आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर (PCMC) गेल्या काही वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र, आता ही सत्ता उलथवण्यासाठी विरोधकांनी मोठी राजकीय चाचपणी सुरू केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट असलेले अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 14, 2025 10:58 AM IST
मराठी बातम्या/Local Body Elections/
Ajit Pawar Local Body Election : अजितदादांना होमग्राउंडवर घेरण्याची तयारी, महाविकास आघाडीला मनसेच्या इंजिन बळ!









