Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: ठाकरे गट आणि मनसेच्या युतीचा मुहूर्त ठरला? जागा वाटपाची चर्चा कधीपासून? समोर आली मोठी अपडेट
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:PRANALI KAPASE
Last Updated:
Shiv Sena UBT and MNS Alliance Updates: शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली असून जागा वाटपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची राजकीय अपडेट समोर आली आहे. मागील काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी होत असताना दुसरीकडे युतीची घोषणा कधी होणार, याची चर्चा सुरू होती. आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली असून जागा वाटपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पक्षांतील संवाद केवळ कौटुंबिक बैठकांपुरता मर्यादित होता. मातोश्री–शिवतीर्थामधील सौहार्दपूर्ण गाठीभेटींमुळे दोन्ही पक्षांतील नातं उबदार झालं असलं, तरी राजकीय समीकरणांवर कोणतीही औपचारिक चर्चा अद्यापपर्यंत झालेली नव्हती. मात्र आता या संबंधांना राजकीय दिशा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मागील काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी होत असताना दुसरीकडे कार्यकर्त्यांमध्येही चांगलीच एकजूट निर्माण झाल्याचे दिसून आले.
advertisement
ठाकरे बंधू-मनसे युतीने समीकरण बदलणार?
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची संभाव्य युती झाल्यास काही महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये मोठे समीकरण बदलू शकते. विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवलीमध्ये याचा परिणाम दिसू शकतो.
जागा वाटपांची चर्चा कधीपासून?
शिवसेना ठाकरे गटाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये मंगळवार, १८ नोव्हेंबर पासून जागा वाटपाची चर्चा सुरू होणार आहे. या बैठकीत ठाकरे गट आणि मनसेचे काही मोजकेच पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेचे प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर जागा वाटपांच्या चर्चा सुरू होतील असा अंदाज बांधला जात होता. त्याआधीच मनसे आणि ठाकरे गटाने आपल्या प्रभागांचा आढावा घेतला होता. आता जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होणार असल्याने ठाकरे गट-मनसेची युती जाहीर होण्याची शक्यता वाढली आहे.
advertisement
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील अलीकडील जवळीक आणि संवादामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे. या चर्चांमधून कोणता नवा राजकीय आराखडा तयार होतो आणि दोन्ही पक्ष प्रत्यक्षात किती जागांवर एकत्र येतात, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 3:08 PM IST
मराठी बातम्या/Local Body Elections/
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: ठाकरे गट आणि मनसेच्या युतीचा मुहूर्त ठरला? जागा वाटपाची चर्चा कधीपासून? समोर आली मोठी अपडेट


