advertisement

आभाळातून कोसळला 'मृत्यू'; पावसाला सुरुवात होताच सोलापूरात दोघांनी गमावला जीव

Last Updated:

आता सोलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूरात दोघांनी गमावला जीव
सोलापूरात दोघांनी गमावला जीव
सोलापूर (प्रीतम पंडित, प्रतिनिधी) : राज्यात मान्सून दाखल झाला असून जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आता पाऊस हजेरी लावत आहे. आजही राज्यातील सगळ्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, हा पाऊस आपल्यासोबत वादळी वारा आणि विजांचा कडकडाटही घेऊन येत आहे. अशातच आता सोलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे.
यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. सोलापूरमध्ये वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर एक व्यक्ती जखमी झाली आहे. यासोबतच दोन शेळ्याही दगावल्या आहेत. या घटना वेगवेगळ्या गावांमध्ये घडल्या आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुर्देहळळी गावात वीज कोसळ्याने आमसिद्ध गायकवाड (वय 67) यांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत गायकवाड यांच्या दोन शेळ्याही दगावल्या आहेत.
advertisement
दुसऱ्या घटनेत कुंभारी गावात ‘बिळेणी डक्के’ या 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वीज पडल्यानेच डक्के यांचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर दोड्डी गावात वीज कोसळल्याने शंकर राठोड हे वृद्ध व्यक्ती जखमी झाले आहेत. जखमी राठोड यांना उपचारसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्ण्यात आलं आहे.
advertisement
दरम्यान, सोलापूरमध्ये आज आणि उद्याही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात वादळ, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 2 दिवस सोलापूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आभाळातून कोसळला 'मृत्यू'; पावसाला सुरुवात होताच सोलापूरात दोघांनी गमावला जीव
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement