आजचं हवामान: कोकणात विश्रांती तर विदर्भात पुढे 48 तास मुसळधार, हवामान विभागाने दिला अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गुजरातपासून पश्चिम बंगालच्या खाडीपर्यंत टर्फ लाइनमुळे विदर्भात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, कोकणात पाऊस कमी, नागपूर अमरावतीसह अनेक जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा.
10 दिवसांच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर हवामानात मोठा बदल झाला आहे. गुजरातपासून पश्चिम बंगालच्या खाडीपर्यंत कमी दाबाचा पट्टा टर्फ लाइन तयार झाली आहे. त्यामुळे विदर्भात पुढचे तीन दिवस अति मुसळधार ते मुसळधार पाऊस राहील असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. कोकणात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसाला आता थोडी विश्रांती घेतली आहे. विदर्भात मात्र पुढील 48 तास मुसळधार पावसाचा जोर राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला.
कोकणात पाऊस कमी होणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवरून पुढील काही दिवस जोरदार पावसाची तीव्रता कमी होईल. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली. यंदा कोकणात 100 टक्क्यांपेक्षा जास्तच पाऊस झाला आहे.
advertisement
विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान, नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी वीजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सतत पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस
औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांतही ढगाळ वातावरण राहून अधूनमधून पाऊस कोसळेल. विदर्भातील जिल्ह्यांत नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नद्या-नाल्यांच्या काठावर जाण्याचे टाळावे, अशी सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 7:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: कोकणात विश्रांती तर विदर्भात पुढे 48 तास मुसळधार, हवामान विभागाने दिला अलर्ट