आंदेकर कुटुंब झालं ट्रॅप, आयुष कोमकर खून प्रकरणात 13 जणांविरोधात गुन्हा दाखल, दोघांना अटक
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Ayush Komkar Case: पुण्यातील नाना पेठेत शुक्रवारी (५ ऑक्टोबर) संध्याकाळी झालेल्या गोळीबारात १९ वर्षीय आयुष कोमकर याचा खून झाल्याप्रकरणी पोलिसांनी संपूर्ण आंदेकर कुटुंबासह १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Ayush Komkar Murder Case: पुण्यातील नाना पेठेत शुक्रवारी (५ ऑक्टोबर) संध्याकाळी झालेल्या गोळीबारात १९ वर्षीय आयुष कोमकर याचा खून झाल्याप्रकरणी पोलिसांनी संपूर्ण आंदेकर कुटुंबासह १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा पूर्वनियोजित कट रचण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ६०) यांच्यासह कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४१), शिवम उर्फ शुभम सूर्यकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४०), तुषार निलंजय वाडेकर (वय २६), स्वराज निलंजय वाडेकर (वय २२), अमन युसुफ पठाण उर्फ खान, सुजल राहुल मेरगु (वय २३), यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे (वय १९) या १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
यापैकी यश पाटील आणि अमित पाटोळे यांना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पूर्ववैमनस्यातून खून
आयुष कोमकर हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा आंदेकर आणि कोमकर टोळ्यांमधील जुने वैर उफाळून आल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा कट रचला.
advertisement
गोळीबार आणि दहशत
फिर्यादीनुसार, अमन पठाण आणि यश पाटील यांनी आयुषवर गोळीबार केला, तर अमित पाटोळे आणि सुजल मेरगू घटनास्थळी उपस्थित होते. गोळीबारानंतर आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. घटनास्थळी पोलिसांना १२ रिकामी काडतुसे मिळाली, तर आयुषच्या शरीरात नऊ गोळ्या आढळून आल्या आहेत.
सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी आरोपींसाठी सात दिवसांची कोठडी मागितली होती, तर बचाव पक्षाने अटक केलेल्या आरोपींचा या गुन्ह्याशी काही संबंध नसल्याचा दावा केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्राजक्ता आपटे यांनी यश पाटील आणि अमित पाटोळे यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 08, 2025 7:13 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
आंदेकर कुटुंब झालं ट्रॅप, आयुष कोमकर खून प्रकरणात 13 जणांविरोधात गुन्हा दाखल, दोघांना अटक