कॅप्टन खरातनंतर आता नांदेडचा महाराज गजाआड, महिलेवर अत्यचार; एक वर्षापासून सुरू होता धक्कादायक प्रकार
- Reported by:Mujeeb Shaikh
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पीडित महिलेने धाडस दाखवून तक्रार दिल्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी नराधम महाराजाला बेड्या ठोकल्या आहेत.
नांदेड : संपूर्ण महाराष्ट्रात भोंदू बाबा कॅप्टन खरातचे प्रकरण गाजत असतानाच, आता नांदेड शहरातून एका तथाकथित महाराजाचा संतापजनक चेहरा समोर आला आहे. एका विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मठातील एका महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने धार्मिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या नांदेड शहरात एका मठाच्या महाराजाकडून महिलेचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका मठात वास्तव्यास असलेल्या 39 वर्षीय हरिगिरी दत्तगिरी महाराज याने एका 46 वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. याप्रकरणी पीडित महिलेने धाडस दाखवून तक्रार दिल्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी नराधम महाराजाला बेड्या ठोकल्या आहेत.
advertisement
लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला 46 वर्षांची असून ती विधवा आहे. हरिगिरी दत्तगिरी महाराज याने या महिलेशी जवळीक साधून तिला लग्नाचे स्वप्न दाखवले. जुलै 2025 पासून हा प्रकार सुरू होता. महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवून महिलेने लग्नासाठी संमती दर्शवली होती. मात्र, लग्नाचे आश्वासन देऊन महाराजांनी महिलेला आपल्या वासनेची शिकार बनवले. गेल्या काही महिन्यांत त्याने तीनवेळा महिलेवर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
advertisement
महाराजाला पोलिसांनी केली अटक
महिलेला जेव्हा आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले, तेव्हा तिने तातडीने भाग्यनगर पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या जबाबानुसार पोलिसांनी हरिगिरी दत्तगिरी महाराजावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. नाशिकच्या कॅप्टन खरात प्रकरणाने आधीच 'भोंदू बाबां'चा विषय ऐरणीवर असताना, नांदेडमधील या घटनेने धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा आणि तिथल्या वर्तणुकीचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 12:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कॅप्टन खरातनंतर आता नांदेडचा महाराज गजाआड, महिलेवर अत्यचार; एक वर्षापासून सुरू होता धक्कादायक प्रकार








