advertisement

CRIME : आईबाप नव्हे सैतान! तीन महिन्याच्या लेकराला गळा दाबून मारलं, शंका येऊ नये म्हणून असा रचला प्लॅन!

Last Updated:

Ahilyanagar Crime Parents becomes devil : आजाराला कंटाळून आई-वडिलांनीच गळा आवळून त्याची हत्या केली आणि त्यानंतर त्याचे प्रेत नदीच्या पुलाखाली फेकून दिलं.

Ahilyanagar
Ahilyanagar
Ahilyanagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे 4 डिसेंबर रोजी मुळा नदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूचे रहस्य आता उघड झालं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना येथून बाळाच्या आई-वडिलांसह तीन जणांना अटक केली आहे. विषेश म्हणजे या प्रकरणाची माहिती कुणाला होऊ नये म्हणून आई वडिलांनी एक बनाव देखील रचला.

आजाराला कंटाळून गळा आवळून हत्या

पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. या तीन महिन्यांच्या बालकाला मणक्याचा गंभीर आजार होता. या आजाराला कंटाळून आई-वडिलांनीच गळा आवळून त्याची हत्या केली आणि त्यानंतर त्याचे प्रेत नदीच्या पुलाखाली फेकून दिले. कविना जाधव हिच्या नातेवाइकांनी या गुन्ह्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement

नातेवाईकांनी रचला बनाव

या घटनेमुळे गावात लोकांना शंका येऊ नये, यासाठी कविना जाधव हिच्या नातेवाइकांनी गावात खोटी माहिती पसरवली होती. त्यांनी लोकांना सांगितले की, बाळाचे छत्रपती संभाजीनगर येथे ऑपरेशन झाले आहे आणि त्याला तीन ते चार दिवसांत हॉस्पिटलमधून सोडण्यात येईल. तसेच, बाळाबाबत लोक विचारणा करतील म्हणून कविना हिला वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनासाठी पाठवले होते, जेणेकरून या गुन्ह्यामागचे सत्य बाहेर येऊ नये.
advertisement
शिवांशच्या जन्मापासूनच त्याच्या कान आणि हातात अपंगत्व असल्याचे समोर आले होते. हे अपंगत्व कधीही बरे होणार नसल्याने आणि बाळ नको असल्यानेच दांपत्याने हा भयावह निर्णय घेतल्याचे त्यांनी कबूल केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्याच्या दिशेने जाताना त्यांना घारगाव जवळ मुळा नदी दिसली आणि त्याचं वेळी त्यांनी स्वतःची चारचाकी गाडी बाजूला लावून शिवांशला झूडपात फेकून दिलं, असंही पोलिसांनी सांगितलं.
advertisement
गोपनीय तपास केला असता मृतक आणि त्याचे नातेवाईक यांची माहिती मिळाली. त्यानंतर प्रकाश पंडित जाधव (३७, रा. भिवपूर), कविता प्रकाश जाधव (३२) आणि हरिदास गणेश राठोड (३२, रा. आव्हाणा) यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
CRIME : आईबाप नव्हे सैतान! तीन महिन्याच्या लेकराला गळा दाबून मारलं, शंका येऊ नये म्हणून असा रचला प्लॅन!
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement