advertisement

Sathankulam Custodial Death Case: 'जयभीम' सिनेमासारखी घटना, बाप आणि मुलाला कोठडीत मारणाऱ्या 9 पोलिसांना फाशीची शिक्षा

Last Updated:

कोर्टाने ९ पोलीस कर्मचाऱ्यांना मृतांच्या कुटुंबीयांना १ कोटी ४० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.

News18
News18
तामिळनाडू: तामिळनाडूमधील इरुलर समाजातील एका इसमाची चोरीच्या संशयावरून पोलिसांनी कोठडीमध्ये हत्या केली होती, या घटनेवर २०२१ मध्ये जयभीम नावाचा सिनेमा आला होता. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत होता. आता अशीच एक घटना समोर आली आहे.  पुन्हा एकदा तामिळनाडू पोलिसांचा राक्षस चेहरा उजेडात आला आहे.  पोलीस कोठडीमध्ये मुलगा आणि वडिलांच्या मृत्यू प्रकरणी ९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावण्याचा ऐतिहासिक निर्णय तामिळनाडूच्या मदुरै सेशन कोर्टाने दिला आहे.
तामिळनाडूमध्ये पोलीस कोठडीमध्ये 19 जून 2020 रोजी लॉकडाऊनच्या काळात दुकानं उघडं ठेवून बाप आणि मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलीस कोठडीमध्ये दोन दिवसांनी मुलाचा मृत्यू झाला होता तर ३ दिवसांनी वडिलांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ६ वर्षांनंतर न्यायालयाने निर्णय दिला. या प्रकरणी ९ पोलिसांना दोषी ठरवण्यात आलं आहे. दुर्मिळ खटला असल्याची नोंद करत पोलिसांनी आपल्या पदाचा गैरवापर करून दोघांचा जीव घेतला, असा निर्णय न्यायालयाने दिला.
advertisement
कोर्टाने ९ पोलीस कर्मचाऱ्यांना मृतांच्या कुटुंबीयांना १ कोटी ४० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे. तब्बल ६ वर्ष या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणात एकूण १० पोलीस कर्मचारी आरोपी होती. यामध्ये १ पोलिसाचा कोविड काळात मृत्यू झाला.
काय आहे प्रकरण?  
19 जून 2020 मोबाईल दुकान चालवणारे  पी. जयराज (59) आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स (31) ला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. लॉकडाऊन असताना दुकान उघडं ठेवलं म्हणून दोघांना ताब्यात घेतलं होतं. दोघांना सथानकुलम पोलीस स्टेशन इथं आणण्यात आलं. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असताना दोघांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. दोघांना पोलिसांनी रात्रभर मारहाण केली. त्यांच्या शरिरावर गंभीर व्रण होते, एवढंच नाहीतर रक्तस्त्राव सुद्धा झाला होता.
advertisement
सीबीआयने तपासात सत्य आणलं समोर
मद्रास हाईकोर्टाने या प्रकरणी राज्य सरकारच्या CB-CID कडून हे प्रकरण CBI कडे सोपवलं होतं. सीबीआयने या प्रकरणाचा सखोल तपास केला असता एक पोलीस निरीक्षक, दोन सह पोलीस निरीक्षक यांच्यासह इतर १० पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.  तपासामध्ये एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने जबाब दिला. मृत पी. जयराज  आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स या दोघांना या नराधम पोलिसांनी रात्रभर मारहाण केली होती. पोलीस स्टेशनमध्ये टेबल आणि लाठ्यांवर रक्त आढळलं होतं. या पोलीस कॉन्स्टेबलचा जबाब महत्त्वाचा ठरला.
advertisement
प्रथम अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी. मुथुकुमारन यांनी सीबीआयने केलेल्या तपासातील मुद्दे ग्राह्य धरले. पोलिसांनी नियोजन पद्धतीने रात्रभर दोघांवर अत्याचार केले. त्यामुळे या पोलिसांनी कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. धक्कादायक म्हणजे, पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज हे दररोज डिलीट होत होते, त्यामुळे महत्त्वपूर्ण पुरावा हाती लागला नाही.
हे होते ते नराधम पोलीस कर्मचारी 
या प्रकरणात पोलीस निरीक्षक  एस. श्रीधर, सह-निरीक्षक पी. रघु गणेश आणि के. बालकृष्णन, हेड कॉन्स्टेबल एस. मुरुगन आणि ए. समदुरई याचा समावेश होता, सोबतच कॉन्स्टेबल एम. मुथुराज, एस. चेल्लादुरई, एक्स. थॉमस फ्रांसिस आणि एस. वेलुमुथु हे सामील होते. या प्रकरणातला दहावा आरोपी स्पेशल सह-निरीक्षक पॉलदुरई याचा सुनावणी सुरू असताना कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/देश/
Sathankulam Custodial Death Case: 'जयभीम' सिनेमासारखी घटना, बाप आणि मुलाला कोठडीत मारणाऱ्या 9 पोलिसांना फाशीची शिक्षा
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement