Ahilyanagar News: खाकी वर्दी घालून लोकांना फसवायचा, भामट्याला पोलिसांनी पकडलं, 5 शहरांमध्ये केलं कांड
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
श्रीरामपूर पोलिसांनी तोतया पोलीस अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील नागरिकांना या भामट्यांनी आपल्या ताब्यात घेतले आहे.
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर गावामध्ये पोलिसांनी तोतया पोलीस ऑफिसरच्या मुसक्या आवळल्या आहेत. अज्ञात व्यक्तींविरोधात तो गुन्हा दाखल करायचा. मुंबईसह जळगाव, पिंपरी चिंचवड, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ऑफिसर बनून सामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचे काम महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू होते. आता अशातच अहिल्यानगर पोलिसांनी अशा आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सध्या पोलिसांकडून या घटनेची सविस्तर चौकशी केली जात आहे. या प्रकरणात आणखीन कोणी दोषी आहेत का? याचा सध्या शोध घेतला जात आहे.
श्रीरामपूर पोलिसांनी स्थानिक रहिवासी ४७ वर्षीय सज्जाद गरीबशाह इराणी या आरोपीला अटक केलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. हा व्यक्ती तोतया पोलीस ऑफिसर बनून सामान्य नागरिकांची फसवणूक करायचा, पोलिसांनी तात्काळ आरोपीच्या मुसक्या आवळत घटनेवर ताबा मिळवला आहे. दरम्यान, 9 ऑगस्ट 2025 रोजी, रविंद्र नारायण राजहंस नावाच्या व्यक्तीची सावेदी परिसरातील जॉगिंग पार्कजवळ उभे असताना, पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत दोन तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची फसवणूक केली. जेव्हा रविंद्र यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले असता त्यांनी लगेचच तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
advertisement
रविंद्र यांनी पोलीस ठाण्यामध्ये दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. श्रीरामपूर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सज्जाद इराणीने गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळताच, त्याला श्रीरामपूर येथून अटक करण्यात आली. त्याने त्याचा भाऊ, मुस्लिम यासीन इराणी (इराणी गल्ली, वॉर्ड क्र. १, श्रीरामपूर) याच्यासोबत गुन्हा केला असल्याची माहिती कबुली दिली. आरोपींनी तोफखाना आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा केल्याची कबुली दिली. श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात सज्जाद इराणी असून त्याच्या भावाचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जात आहे. सज्जाद इराणीसह त्याच्या भावाच्या विरोधात मुंबईसह जळगाव, पिंपरी चिंचवड, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 5:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahilyanagar News: खाकी वर्दी घालून लोकांना फसवायचा, भामट्याला पोलिसांनी पकडलं, 5 शहरांमध्ये केलं कांड






