advertisement

भाजप आमदार संजय केनेकरांना जीवे मारण्याचा कट? रात्री भेटायला आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत घातक हत्यार

Last Updated:

छत्रपतीसंभाजीनगर शहरातील भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी रात्री त्यांना भेटायला आलेल्या एका व्यक्तीच्या बॅगमध्ये घातक हत्यार सापडलं आहे.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: शहरातील भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी रात्री त्यांना भेटायला आलेल्या एका व्यक्तीच्या बॅगमध्ये घातक हत्यार सापडलं आहे. हा प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. आमदार केनेकर यांच्या घातपाताचा हा प्रयत्न होता का? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी आमदार संजय केनेकर यांना भेटण्यासाठी काही लोक त्यांच्या कार्यालयात आले होते. भेटीनंतर परत जाताना त्यापैकी एका व्यक्तीची आपली बॅग कार्यालयातच विसरली. काही वेळाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ही बॅग तपासली असता, त्यामध्ये एक बंदूक आढळून आली. आमदारांच्या कार्यालयात अशा प्रकारे शस्त्र सापडल्याने एकच खळबळ उडाली. आता घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी संबंधित बॅग आणि बंदूक ताब्यात घेतली. या प्रकरणाबाबत माहिती देताना क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले की, "आमदार केनेकर यांच्या कार्यालयात सापडलेली ती बंदूक ही 'एअरगन' आहे." पोलिसांनी तातडीने तपास करत ती बॅग कोणाची होती, याचा शोध सुरू केला आहे.
advertisement

घातपाताचा संशय आणि पोलिसांचा तपास

या घटनेमुळे केनेकर यांच्यासोबत काही घातपात घडवण्याचा कट रचला होता का? ती व्यक्ती कोण होती? ती एअरगन घेऊन का फिरत होती? आणि ती विसरण्यामागे काही विशिष्ट हेतू होता का? या सर्व बाजूंचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजप आमदार संजय केनेकरांना जीवे मारण्याचा कट? रात्री भेटायला आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत घातक हत्यार
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement