पुण्यात भाजपचं धक्कातंत्र, महापौरपदी राष्ट्रवादीच्या आमदाराची सूनबाई? स्पर्धेत नाव आघाडीवर

Last Updated:

Pune Mayor Reservation: पुणे महापालिका महापौरपदी खुल्या प्रवर्गातील महिला यंदा विराजमान होईल.

ऐश्वर्या पठारे
ऐश्वर्या पठारे
वैभव सोनवणे, प्रतिनिधी, पुणे : प्रमुख पदावर व्यक्ती बसवताना भारतीय जनता पक्ष धक्कातंत्राचा वापर करतो, हे अनेकदा दिसून आले आहे. पुण्यातही महापौरपदाबाबत भाजप अशाच धक्कातंत्राचा वापर करू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महापौरपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलेला निश्चित झालेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या सूनबाई ऐश्वर्या पठारे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. उच्चशिक्षित असलेल्या ऐश्वर्या पठारे यांच्या नावाचा विचार पुणे महापौरपदासाठी होऊ शकतो, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
राज्यातील २९ महापालिकाच्या महापौर पदाची आरक्षण सोडत मुंबईत पार पडली. पुणे महापालिका महापौरपदावर खुल्या प्रवर्गातील महिला यंदा विराजमान होईल. आरक्षण प्रक्रियेनंतर भाजपमधील अनेक महिला नगरसेवकांची नावे महापौरपदासाठी चर्चेत आली आहे. त्यापैकी मंजुषा नागपुरे, निवेदिता एकबोटे, मंजुश्री खर्डेकर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या ऐश्वर्या पठारे यांच्या नावाची चर्चा आहे.
advertisement

कोण आहेत ऐश्वर्या पठारे?

महापौरपदाच्या शर्यतीत अचानक वडगाव शेरीतून आठ नगरसेवक निवडून आणणाऱ्या पठारे कुटूंबातल्या ऐश्वर्या पठारे यांचे नाव स्पर्धेत पुढे आले आहे. ऐश्वर्या पठारे या विमाननगर लोहगाव प्रभागातून निवडून आल्या आहेत. ऐश्वर्या पठारे या उच्चशिक्षित नगरसेविका असून त्यांचे पती सुरेंद्र पठारेही नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांचे सासरे बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आहेत.
advertisement
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ऐश्वर्या पठारे आणि त्यांचे पती सुरेंद्र पठारे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच भाजपनेही प्रवेश केल्याबरोबर त्यांना उमेदवारीची घोषणा केली. भाजप निष्ठावंतांनी पक्षाच्या निर्णयावर मोठी नाराजी व्यक्त केली होती. परंतु ऐश्वर्या पठारे आणि सुरेंद्र पठारे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून पुणे महापालिका सभागृहात पाऊल ठेवले आहे.
advertisement

महिला आरक्षणाने अनेक दिग्गजांना धक्का

पुणे महापालिका महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गातील महिलेला आरक्षण निश्चित झाल्याने गणेश बीडकर, धीरज घाटे, श्रीनाथ भीमाले, राजेंद्र शिळीमकर, किरण दगडे पाटील आदी दिग्गजांना नेत्यांना धक्का बसला. भाजपचे पहिल्या फळीतील नेते महापौरपदाकडे आस लावून बसलेले असताना महिला आरक्षण निश्चित झाल्याने अनेकांना हिरमोड झाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यात भाजपचं धक्कातंत्र, महापौरपदी राष्ट्रवादीच्या आमदाराची सूनबाई? स्पर्धेत नाव आघाडीवर
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement