अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीचे ठुमके, सोशल मीडियावर Video ने धुमाकूळ घातला

Last Updated:

Ajit Pawar NCP Lavni Show Diwali Milan Event: अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर कार्यालयात दिवाळीनिमित्त लावणीचे ठुमके लगावले गेले.

अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीचे ठुमके
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीचे ठुमके
उदय तिमांडे, प्रतिनिधी, नागपूर : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नागपूर कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमात लावणीवर ठुमके लगावण्यात आले. समाज माध्यमांवर वेगाने पसरलेल्या चित्रफितीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या लावणीचा आनंद घेत असताना दिसून येत आहेत.
आगामी महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून दिवाळी सणाच्या निमित्ताने राजकीय पक्ष दिवाली मिलन कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना एकत्र आणून निवडणुकीच्या अनुषंगाने अनेकानेक मुद्द्यांवर चर्चा करीत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटानेही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमातील चित्रफित समाज माध्यमांवर वेगाने पसरत आहे.
advertisement

राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीचे ठुमके

चित्रफितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, महिला पदाधिकारी बसल्याचे दिसत आहे. त्यांच्यासमोर नटरंग चित्रपटातील मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा या लावणीवर एक महिला नृत्य करीत आहे. ही महिला पक्षाची कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर राष्ट्रवादीचे विशेष लक्ष

advertisement
महायुती सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहेत. पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड महापालिकांत पक्षाची कामगिरी उंचावण्याचा अजित पवार यांचा मानस आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जास्त जास्त उमेदवार निवडून आणण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीचे ठुमके, सोशल मीडियावर Video ने धुमाकूळ घातला
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement