advertisement

'VSRचे 2 पायलट अजूनही गायब', अमोल मिटकरींना वेगळाच संशय, खळबळजनक दावा

Last Updated:

Amol Mitkari News: अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. व्हीएसआर विमान कंपनीचे दोन पायलट अजूनही गायब असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

News18
News18
कुंदन जाधव, प्रतिनिधी अकोला: २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता विविध शंका आणि संशय उपस्थित केला जात आहे. हा अपघात नसून घातपात असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ते विविध ठिकाणी पत्रकार परिषद घेत सातत्याने अपघातावर भाष्य करत आहेत.
आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. व्हीएसआर विमान कंपनीचे दोन पायलट अजूनही गायब असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी जय पवारांच्या शंकेला दुजोरा दिला आहे. ब्लॅक बॉक्सचा डेटा नष्ट होऊ शकत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. शिवाय रोहित पवारांच्या जीवाला धोका असेल तर ही बाब गांभीर्याने घ्यावी, असंही मिटकरी म्हणाले.
advertisement
जय पवारांनी ब्लॅक बॉक्सचा डेटा नष्ट होऊ शकत नाही, अशी शंका उपस्थित केली. अजित दादांचा घातपात झाला की अपघात अशी शंका उपस्थित केली आहे. याला अमोल मिटकरींना सुद्धा दुजोरा दिला आहे. पण साहिल मदन आणि यश नावाचे दोन पायलट अजूनही गायब आहेत, त्यांचे सीसीटीव्ही फुटेज आधी जमा करा मग ब्लॅक बॉक्सचा डेटा जमा करा अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.
advertisement
रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत काही खुलासे केले आहेत. आता त्यांच्या जीवाला धोका असल्याची शंका व्यक्त केली जात आहे, यासंदर्भात त्यांनी सरकारला निवेदन द्यावं आणि सरकार त्यांना सुरक्षा देईल, असं मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं आहे. रोहित पवारांनी मुद्दा उचलला आणि त्यांच्या जीवाला धोका असेल तर ही बाब गांभीर्याने घ्यायल हवे असही मिटकरी म्हणाले, कारण प्रश्न विचारण जिवापर्यंत बेतत असेल तर अशी रिस्क घ्यायल आम्ही सगळे तयार आहोत, असंही मिटकरी म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'VSRचे 2 पायलट अजूनही गायब', अमोल मिटकरींना वेगळाच संशय, खळबळजनक दावा
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement