अजितदादांसाठी हळहळले जय पवार, VSRचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर, जीवाशी खेळ करणारा विमानातील VIDEO आणला समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Ajit Pawar Plane Crash VIDEO: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आता एक महिन्याहून अधिकचा काळ उलटून गेला आहे. मात्र अजूनही कुटुंबीयांच्या वेदना कमी झाल्या नाहीत. दरम्यान, जय पवारांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा व्हिडीओ समोर आणला आहे.
Ajit Pawar Plane Crash VIDEO: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आता एक महिन्याहून अधिकचा काळ उलटून गेला आहे. त्यांचा अपघात कसा झाला? तो अपघात होता की घातपात? याची उत्तरं अद्याप मिळाली नाहीत. अलीकडेच अजितदादांच्या अपघाताचा चौकशीचा अहवाल समोर आला आहे. एका झाडाला धडकून विमान खाली कोसळल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. या अहवालावर आता विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. हा अहवाल खूपच वरवर असल्याचा आरोप केला जात आहे. अपघाताबाबत थातुरमातूर कारणं दिल्याचा आरोपही केला जात आहे.
या सगळ्या घडामोडी सुरू असताना आता अजित पवारांचे पूत्र जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आणला आहे. व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह यांचा एक व्हिडीओ जय पवारांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात रोहित सिंह हा विमान हवेत असताना पायलट सीटवर बसून झोपा काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जय पवारांनी रोहित सिंहच्या अटकेची मागणी केली आहे.
advertisement
जय पवारांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, "माझ्या वडिलांना आपण गमावलं. ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे."
"मी DGCA ला ठामपणे मागणी करतो की या प्रकरणात तत्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तत्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे, माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी" असं जय पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
advertisement
advertisement
जय पवारांनी शेअर केलेला हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोकांकडून व्हीएसआर कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. रोहित पवारांनी देखील यापूर्वी रोहित सिंह यांच्यावर विविध गंभीर आरोप केले होते. ही विमान कंपनी कशाप्रकारे नियमांचं भंग करते, याची सगळी माहिती समोर आणली होती. आता या नव्या व्हिडीओमुळे रोहित सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत प्रतिक्रिया विचारण्यासााठी व्हीएसआर कंपनीसह रोहित सिंह यांना संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 7:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांसाठी हळहळले जय पवार, VSRचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर, जीवाशी खेळ करणारा विमानातील VIDEO आणला समोर







