Pune Fraud : मॅट्रिमोनियल साईटवर भेटला उच्चशिक्षित जयेश; फक्त 2 महिन्यांची ओळख अन् पुण्यातील महिलेनंही विश्वास ठेवला, शेवटी नको ते घडलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आरोपीने एका प्रसिद्ध विवाह संकेतस्थळावर खोट्या नावाने प्रोफाईल तयार केले होते. त्याने पीडित महिलेशी संपर्क साधला आणि आपण इस्रोमध्ये वैज्ञानिक पदावर कार्यरत असल्याचे खोटे सांगितले.
पिंपरी-चिंचवड : आपल्याला लग्नासाठी चांगला जोडीदार मिळावा,अशी प्रत्येकाची इच्छा असते. कोणी ओळखीतून,कोणी मैत्रीतून तर कोणी ऑनलाईन पद्धतीनं आपलं प्रेम शोधत असतं. मात्र, हे कधीकधी किती घातक ठरू शकतं, याचा प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. यात विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून (Matrimonial Site) ओळख करून एका भामट्याने महिलेला तब्बल २७ लाख रुपयांना गंडा घातल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना ताथवडे परिसरात समोर आली आहे. स्वतःला इस्रोचा (ISRO) वैज्ञानिक असल्याचे भासवून या भामट्याने ही फसवणूक केली. याप्रकरणी आदर्श प्रशांत म्हात्रे उर्फ जयेश पाटील (वय ३६, रा. अलिबाग) याच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने एका प्रसिद्ध विवाह संकेतस्थळावर खोट्या नावाने प्रोफाईल तयार केले होते. त्याने पीडित महिलेशी संपर्क साधला आणि आपण इस्रोमध्ये वैज्ञानिक पदावर कार्यरत असल्याचे खोटे सांगितले. विश्वासाच्या जोरावर त्याने २७ नोव्हेंबर २०२४ ते ३० जानेवारी २०२५ या कालावधीत महिलेकडून वेळोवेळी एकूण ४२ लाख ६४ हजार ३२ रुपये उकळले.
advertisement
सायबर पोर्टलमुळे काही रक्कम परत
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने तातडीने केंद्रीय सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवली. या तक्रारीमुळे तांत्रिक हालचाली होऊन महिलेला काही रक्कम परत मिळवण्यात यश आले. मात्र, तरीही आरोपीने २७ लाख रुपयांचा गंडा घातला असून ही रक्कम अद्याप परत मिळालेली नाही.
पीडितेने शनिवारी (२८ फेब्रुवारी) वाकड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद दिली आहे. ऑनलाईन ओळख करताना आणि पैसे देताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. वाकड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 6:48 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Fraud : मॅट्रिमोनियल साईटवर भेटला उच्चशिक्षित जयेश; फक्त 2 महिन्यांची ओळख अन् पुण्यातील महिलेनंही विश्वास ठेवला, शेवटी नको ते घडलं








