'काकांचा सल्ला जोपर्यंत घेत होते तोपर्यंत...'; संजय राऊतांनी पुन्हा अजितदादांना डिवचलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करताना त्यांना खोचक टोला लगावला आहे.
अकोला, कुंदन जाधव, प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील खोचक टोला लगावला आहे. 'महायुतीचा लोकसभेत दारूण पराभव झाला, काही जागा कमी फरकानं पडल्या. लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे, आमचं सरकार आल्यावर या योजनेचे पैसे वाढवू 'असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत?
'महायुतीचा लोकसभेत दारूण पराभव झाला, काही जागा कमी फरकानं पडल्या. लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे, आमचं सरकार आल्यावर या योजनेचे पैसे वाढवू. या आधी फुटलेले लाडके आमदार, लाडके खासदार यांच्यापलीकडे यांना काही दिसत नव्हते.
निवडणुका वेळेत घ्याव्याच लागतील. नितीन देशमुखांना सातत्याने त्रास दिला जातोय. पण ते विकल्या गेले नाहीत. ते मोदी-शहांच्या तुरूंगाच्या भिंती फोडून आलेत. मोदी, शहा, फडणवीस यांनी जेवढं महाराष्ट्राचं नुकसान केलं तेव्हढं नुकसान गेल्या 100 वर्षांत कुणी केलं नाही.' असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
advertisement
अजित पवारांना टोला
दरम्यान सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय चुक होता असं अजित पवार म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. अजित पवारांना उपरती का झाली? माहिती नाही. काकांचा सल्ला जोपर्यंत घेत होते तोपर्यंत त्यांचं बरं सुरू होतं. अजितदादा राखी बांधायला सुप्रिया सुळेंकडे जातील तेंव्हा त्या काय करतील याकडे महाराष्ट्र पाहतोय. त्यांच्यासाठी अख्खा महाराष्ट्र लढला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Location :
Akola,Akola,Maharashtra
First Published :
August 14, 2024 12:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अकोला/
'काकांचा सल्ला जोपर्यंत घेत होते तोपर्यंत...'; संजय राऊतांनी पुन्हा अजितदादांना डिवचलं