Rain and Flood: सांगली कोल्हापूरच्या पुरस्थितीवरून सर्वपक्षीय नेत्यांची धावाधाव, अलमट्टीबाबत मोठा निर्णय होणार?
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
सांगली, कोल्हापुरातील पुरस्थितीवरून आता सर्वपक्षीय नेत्यांची धावाधाव सुरू झाली आहे. अलमट्टी धरणातून तात्काळ पाण्याचा विसर्ग केल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणाता राहू शकतो...
कोल्हापूर:
प्रत्येक पावसाळ्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूराच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. अशावेळी जिल्ह्यांतील पंचगंगा, कृष्णा या नद्यांना पूर येतो. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कर्नाटक सरकारशी बोलणी करून अलमट्टी धरणातील विसर्ग वाढवावा लागतो. अगदी तशाच प्रकारची परिस्थिती यंदा देखील पाहायला मिळत आहे. पुढील काळात पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास सांगली आणि कोल्हापूर पुरामुळे वेठीस धरलं जावू शकतं. त्यामुळे अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग गरजेनुसार नियमित करण्याची गरज आहे. आता सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींनी आतापासून धावाधाव सुरू केली आहे.
advertisement
सतेज पाटील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला:
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांची भेट घेतली. संबंधित विभागांना पाण्याचे तात्काळ नियमन करावे, अशा सूचना देण्याची मागणी त्यांच्याकडे पाटील यांनी केली. यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन कर्नाटक सरकारने दिले आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे खासदार धनंजय महाडिक यांची मागणी:
advertisement
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसण्याची भीती आहे. अशावेळी महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी, कर्नाटकातील अलमट्टी धरणातून किमान 3 लाख क्युसेकने पाणी विसर्ग सुरू करणे आवश्यक आहे. तसेच संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने तातडीने एक उच्चस्तरीय समिती नेमावी आणि महाराष्ट्र कर्नाटक मधील जलसंपदा खात्यांच्या अधिकाऱ्यांत समन्वय ठेवावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी आज केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी आर पाटील यांच्याकडे केली.
advertisement
खासदार विशाल पाटील आक्रमक:
या संभाव्य पूरस्थितीवर बोलताना विशाल पाटील म्हणाले की, "बिहारला पुरस्थिती नियंत्रणासाठी बक्कळ निधी दिला जातो. तसा महाराष्ट्राला का मिळत नाही? अलमट्टी धरणाबाबत केंद्र सरकारने तात्काळ लक्ष घालून योग्य उपाययोजन कराव्यात" अशी मागणी खासदार विशाल पाटलांनी केली. काँग्रेसचे आमदार विशाल पाटील देखील संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
advertisement
सर्व नेतेमंडळी संभाव्य पुरस्थितीवरून सतर्क झाल्याने कर्नाटक सरकारने सहकार्य केल्यास यंदा पुरस्थितीवर नियंत्रण मिळवता येणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
July 25, 2024 4:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rain and Flood: सांगली कोल्हापूरच्या पुरस्थितीवरून सर्वपक्षीय नेत्यांची धावाधाव, अलमट्टीबाबत मोठा निर्णय होणार?


