Amrawati News: 22 दिवसाच्या बाळाला गरम विळ्याचे 65 चटके, धक्कादायक कारणं आलं समोर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
माझ्या मुलाला चटके कोणी दिले ते मला माहित नाही. जेव्हा चटके दिले तेव्हा मी घरी नव्हतो अशी प्रतिक्रिया लहान बाळाच्या वडिलांनी दिली.
अमरावती: जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावातील 22 दिवसाच्या बाळाला गरम विळा तापवून पोटावर 65 वेळा चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.गावातील भूमका म्हणजे भोंदूबाबाने चटके दिल्याची चर्चा असल्याने पुन्हा एकदा अतिदुर्ग मेळघाटात अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे 22 दिवसीय बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला नातेवाईकांनी सिमोरी गावावरून हतरू प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले होते. मात्र बाळाची गंभीर प्रकृती पाहता तेथून या बाळाला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात पाठवण्यात आले असून तिथे बाळावर स्त्री रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मेळघाटातील सिमोरी येथील फुलवंती राजू धिकार या महिलेची 3 फेब्रुवारी रोजी अचलपूरच्या रुग्णालयात प्रसुती झाली. घरी गेल्यानंतर या बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून बाळाच्या नातेवाईक त्याला भोंदूबाबकडे घेऊन गेले, त्या भोंदूबाबाने बाळाला गरम चटके दिल्याची चर्चा आहे. बाळाला हृदयाचा त्रास आहे,त्याला श्वास घ्यायला त्रास होतो त्रास त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला नागपूरला देखील पाठवण्यास लागू शकते अशी माहिती डॉक्टरांनी दिली.. सध्या या बाळावर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील अति दक्षता विभागात उपचार सुरू आहे.
advertisement
बाळाला चटके नेमकं कोणी दिले?
माझ्या मुलाला चटके कोणी दिले ते मला माहित नाही. जेव्हा चटके दिले तेव्हा मी घरी नव्हतो अशी प्रतिक्रिया लहान बाळाच्या वडिलांनी दिली. त्यामुळे नेमके बाळाच्या पोटाला चटके दिले कोणी असा प्रश्न उपस्थित होत आहे. मेळघाटात लहान बाळांना कुठलाही आजार झाला तर एकतर भुमक्या मार्फत अथवा घरातील ज्येष्ठ सदस्यांकडून पोटावर चटके देण्याची प्रथा आहे त्यातूनच हा प्रकार घडला असावा मात्र सध्या तक्रार दाखल होण्याच्या भीतीने चटके कोणी दिले हे मात्र बाळाचे वडील सांगण्यास तयार नाहीत.
advertisement
मेळघाटमध्ये चटके देण्याचे प्रकार
चटके देण्याचे प्रकार मेळघाटमध्ये सातत्याने घडताना दिसतात. आम्ही यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलनाचा मेळघाट मधील 22 गावात कार्यक्रम राबविला होता, पण अशा प्रकारचे उपक्रम मेळघाट मध्ये राबविण्याची गरज आहे,मात्र शासनाचे उदासीन धोरण यातून दिसून येत आहे..आम्हाला शासनाकडून जसे सहकार्य पाहिजे तसे मिळत नाही,असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आला
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2025 5:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amrawati News: 22 दिवसाच्या बाळाला गरम विळ्याचे 65 चटके, धक्कादायक कारणं आलं समोर









