Video: ये देवेंद्रsss..... मुख्यमंत्र्यांना अंगाखांद्यावर खेळवलेली महिला जेव्हा भरसभेत हाक मारते! नेते-अधिकारी स्तब्ध, नेमकं काय घडलं?

Last Updated:

अमरावतीच्या धारणी येथील सभा आटोपून मुख्यमंत्री माघारी फिरत असताना एका महिलेने मुख्यमंत्री फडणवीस यांना मोठ्याने देवेंद्र म्हणून आवाज दिला.

देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
अमरावती : नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मेळघाटातील धारणी येथे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक प्रश्न सांगून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न एका महिलेने केला. मी देवेंद्रला लहान असताना अंगाखांद्यावर खेळवलंय, म्हणूनच तो माझ्याकडे लगोलग आला. रस्ता पाण्याच्या समस्या सोडविण्याचा त्याने शब्द दिलाय, असे महिलेने मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितले.
अमरावतीच्या धारणी येथील सभा आटोपून मुख्यमंत्री माघारी फिरत असताना एका महिलेने मुख्यमंत्री फडणवीस यांना मोठ्याने आवाज दिला. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांना देवेंद्र म्हणून हाक दिल्याने सगळे अधिकारी, कर्मचारी, सोबकचे नेतेही एकमेकांकडे पाहू लागले. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तत्काळ मागे वळून पाहिले. त्यावेळी शेजारी उभा राहिलेल्या महिलेने त्यांना नारळ शाल देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच काही मिनिटांच्या भेटीत मेळघाटातील समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
advertisement

मी देवेंद्रला अंगाखांद्यावर खेळवलं, लहान असताना एकत्र खेळलोय

माझे मूळ गाव धारणी आहे. मेळघाटात सामाजिक कार्यकर्ती म्हणून मी काम करते. एक सर्वसाधारण महिला आहे. मला त्यांना एवढेच सांगायचे होते की मेळघाटात रस्ता, नाले आणि पाण्याची समस्या सर्वात जास्त आहे. नागरिकांना याच तीन समस्या प्रामुख्याने भेडसावतात, हा समस्यांकडे लक्ष द्या, असे मी त्यांना सांगितले. देवेंद्रच्या बहिणी माझ्या वर्गात होत्या. आम्ही एकत्र शिकलोय. त्यांच्या काकू आमच्या मामी आहेत. लहानपणी मी देवेंद्रला अंगाखांद्यावर खेळवलं, असे महिलेने सांगितले.
advertisement

माझ्या समस्या ऐकून घेतल्यानंतर तत्काळ मार्गी लावतो, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला

माझ्या समस्या ऐकल्यानंतर रस्ता करून देतो आणि बाकीच्या समस्याही सोडवतो, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी मला दिला, असेही महिलेने सांगितले. देवेंद्र फडणवीस यांचे मूळगाव चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आहे आणि माझेही माहेर चंद्रपूरमधील मूल आहे. आमची ओळख होती, मी त्याला आवाज दिला म्हणूनच तो आला नाहीतर आला नसता, असेही मिश्किलपणे 'लाडकी बहीण' म्हणाली.
advertisement

महिलेला दूर करण्यास सुरक्षारक्षक पुढे सरसावले, मुख्यमंत्र्यांनी थांबवले

मुख्यमंत्र्यांचा हात घेऊन महिला आस्थावाईकपणे त्यांची चौकशी करीत होती. बालपणीच्या आठवणी सांगत होती. यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या अवतीभवती असलेल्या सुरक्षारक्षकांनी महिलेचा हात मागे सारण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना रोखले. बोलू द्या असा हातानेच इशारा करून सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Video: ये देवेंद्रsss..... मुख्यमंत्र्यांना अंगाखांद्यावर खेळवलेली महिला जेव्हा भरसभेत हाक मारते! नेते-अधिकारी स्तब्ध, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
ZP Election : महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं...
महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं
  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

View All
advertisement