Amrit Bharat Express : गूडन्यूज! वर्धेकरांना मिळणार आणखी एक 'अमृत भारत एक्स्प्रेस',थांबे काय आणि कधी पासून धावणार?

Last Updated:

वर्ध्यातील प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून वर्धेकरांना आणखीण अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेन दिली जाणार आहे.त्यामुळे वर्धेकरांचा प्रवास आणखीण आरामदायी होणार आहे.

Amrit Bharat Express
Amrit Bharat Express
Amrit Bharat Express : वर्ध्यातील प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून वर्धेकरांना आणखीण अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेन दिली जाणार आहे.त्यामुळे वर्धेकरांचा प्रवास आणखीण आरामदायी होणार आहे. दरम्यान या नवीन एक्स्प्रेसचा शुभारंभ नेमका कधी होणार आहे? आणि ही ट्रेन कधीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहे? हे जाणून घेऊयात.
इंडियन रेल्वेने ब्रह्मपूर आणि उधना (सुरत) दरम्यान एक नवीन अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.ही ट्रेन वर्ध्यातून धावणार आहे.ही ट्रेन ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरात यासारख्या अनेक राज्यांमधील अनेक प्रमुख जिल्ह्यांना जोडणार आहे. या एक्सप्रेसचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. वर्धेकरांसाठी ही दुसरी अमृत भारत एक्स्प्रेस सेवेत येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या एक्सप्रेसचा उद्धाटन सोहळा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे,अशी माहिती मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.त्यामुळे या एक्स्प्रेसचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
advertisement

टाईमटेबल काय?

ब्रह्मपूर ते उधना (सुरत) अमृत भारत ट्रेनचे 27 सप्टेंबर रोजी उद्घाटन होणार आहे. ट्रेन क्रमांक 09022 ब्रह्मपूर- सूरत (उधना) अमृत भारत एक्सप्रेस शनिवारी, 27 सप्टेंबर रोजी ब्रह्मपूर येथून 12:00 वाजता सुटेल आणि पुढील 2:00 वाजता सुरत (उधना) येथे पोहोचेल.
ब्रह्मपूर ते उधना (सुरत) अमृत भारत ट्रेन सुमारे 33 तासांत 1708 किमी अंतर कापेल. ही ट्रेन विजयनगरम-रायगडा-तितलागड-रायपूर-नागपूर-भुसावळ मार्गे धावेल आणि प्रमुख शहरे आणि शहरांना जोडेल.
advertisement

एक्स्प्रेसचे थांबे

ब्रह्मपूर आणि उधना (सुरत) दरम्यानच्या प्रवासादरम्यान, ही नवीन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन पलासा, विझियानगरम, रायगडा, टिटलागड, रायपूर, नागपूर, भुसावळ आणि नंदुरबार या प्रमुख स्थानकांवर थांबेल. याशिवाय श्रीकाकुलम, बोबिली, पार्वतीपुरम, सुंगारपूर रोड, मुनीगुडा, केसिंगा, कांताबंजी, खरियार रोड, महासमुंद, लाखोली, दुर्ग, गोंदिया, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, जळगाव, धरणगाव, अमळनेर, सिंदखेडा, बरदखेडा, बरदखेडा, बरडचाडा, बरचवाडा येथे ही गाडी थांबेल.
advertisement

कोच पोझिशन कशी असणार?

ब्रह्मपूर ते उधना (सुरत) अमृत भारत एक्स्प्रेस कोच रचना ब्रह्मपूर ते उधना (सुरत) अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये 22 डबे असतील ज्यात जनरल सेकंड क्लास सिटिंग- 11 डबे, स्लीपर क्लास-08 डबे, सेकंड क्लास कम लगेज व्हॅन- 02 डबे आणि पँट्री कार-01.

विदर्भाच्या विकासाला वेग मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे. वर्धेकरांसाठी दुसरी अमृत भारत एक्सप्रेस सूरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. विदर्भाच्या विकासाला वेग देणारी 'अमृत भारत एक्स्प्रेस'असणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच वर्ध्यातील प्रवाशांसाठी ओडिसा,छत्तीसगड आणि गुजरात दरम्यान आरामदायी, वेळेची बचत करणारी आणि सर्वांना परवडणारी साप्ताहिक लागोपाठ दुसरी अमृत भारत एक्सप्रेस असणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच वर्धा व विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी ही महत्त्वाची भेट दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले आहे.
advertisement
दरम्यान वर्धेकरांसाठी याआधी आधीच अमृत भारत एक्स्प्रेस धावते आहे.त्यात आता पुन्हा दुसरी अमृत भारत एक्स्प्रेस धावणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amrit Bharat Express : गूडन्यूज! वर्धेकरांना मिळणार आणखी एक 'अमृत भारत एक्स्प्रेस',थांबे काय आणि कधी पासून धावणार?
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement