संतोष बांगरांच्या वहिनीविरोधात ठाकरेंच्या नेत्याच्या बहिणीला तिकीट, हिंगोलीत काँटे की टक्कर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Hingoli Nagar Palika Election: आमदार संतोष बांगर यांचे राजकीय विरोधक असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते विनायक भिसे यांच्या बहिणीला उमेदवारी देण्यात आली आहे.
हिंगोली : हिंगोली नगरपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आले असून नगरपरिषदेची निवडणूक एकत्रित लढवणार आहेत. हिंगोली नगराध्यक्षपदासाठी ठाकरे शिवसेनेच्या अर्चना श्रीराम भिसे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. आज महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत संयुक्त पत्रकार परिषदेत नाव जाहीर केले आहे. उद्या महाविकास आघाडीचा उमेदवार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
आगामी निवडणुकीच्या निमित्ताने हिंगोलीतील राजकारण तापले आहे. आमदार संतोष बांगर आणि भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या उपस्थितीत हिगोंली नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शिंदेसेनेकडून रेखा बांगर यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. रेखा बांगर यांच्याविरोधात ठाकरे सेनेच्या अर्चना श्रीराम भिसे लढणार आहेत.
अर्चना श्रीराम भिसे ठाकरे सेनेच्या उमेदवार, संतोष बांगरांच्या वहिनीविरोधात लढणार
advertisement
हिंगोली नगरपरिषदेत महायुती होण्याची शक्यता मावळत चालली आहे. कारण शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी स्वबळाचा नारा देत त्यांच्या वहिणी रेखाताई श्रीराम बांगर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काल भारतीय जनता पक्षाने त्यांच्या उमेदवार नीता बाबाराव बांगर यांचा उमेदवारी दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी एकत्र येत अर्चना श्रीराम भिसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
advertisement
महाविकास आघाडीने कंबर कसली
अर्चना श्रीराम भिसे या उबाठा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा सहसंपर्कप्रमुख विनायक भिसे यांच्या भगिनी आहेत. हिंगोलीत विनायक भिसे आणि संतोष बांगर मागील अनेक वर्षांपासून कट्टर राजकीय विरोधक आहेत. ठाकरे गटाने भिसे यांच्या भगिनीला तिकीट देऊन हिंगोलीची सढत अधिकच रंगतदार केली आहे. तसेच महाविकास आघाडीने नगर परिषदेसाठी कंबर कसल्याचे चित्र आहे.
view commentsLocation :
Hingoli,Maharashtra
First Published :
November 16, 2025 4:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संतोष बांगरांच्या वहिनीविरोधात ठाकरेंच्या नेत्याच्या बहिणीला तिकीट, हिंगोलीत काँटे की टक्कर


