Arun Gawli BMC: मांडवली की फूट पडणार? डॅडीच्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?

Last Updated:

BMC Election : डॅडीची वहिनी वंदना गवळी आणि लेक योगित गवळी आमनेसामने आल्यात आहेत. त्यामुळे आता अरुण गवळी दगडी चाळीत मांडवली करणार की घरातच फूट पाहणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मांडवली नाहीच, 'डॅडी'च्या घरातही राजकीय फूट! दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी निवडणुकीच्या रिंगणात
मांडवली नाहीच, 'डॅडी'च्या घरातही राजकीय फूट! दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी निवडणुकीच्या रिंगणात
सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. प्रभाग रचना, आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी आपल्या उमेदवारीचा दावा करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. राजकारणामुळे मोठ्या घरांमध्ये फूट पडली. अशीच फूट आता अंडरवर्ल्ड डॉन राहिलेल्या अरुण गवळी यांच्या कुटुंबात पडण्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीवरून डॅडीची वहिनी वंदना गवळी आणि लेक योगित गवळी आमनेसामने आल्यात आहेत. त्यामुळे आता डॅडी दगडी चाळीत मांडवली करणार की घरातच फूट पाहणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
advertisement
अरुण गवळींच्या घरातील तिसरी व्यक्ती आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे . अरुण गवळींची धाकटी कन्या योगिता गवळी यांनी काही दिवसांपूर्वी आपली उमेदवारी जाहीर केली होती. पण योगिता यांनी निवडणुकीची घोषणा करताच भायखळ्यात खळबळ माजलीय. गवळी कुटुंबातील तिसरी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे नाही तर गवळी कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत .
advertisement
गवळींची धाकटी कन्या योगिता गवळी यांनी काही दिवसांपूर्वी पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, मी “योगिता अरुणभाई गवळी “आपल्या भायखळातील प्रभाग “क्रमांक २०७ “ह्या प्रभागातून इच्छुक उमेदवार म्हणून रिंगणात उतरत आहे. जसे २००४ साली आपण विधानसभेच्या निवडणूकितडॅडी”वर प्रेम केलेत आणि मतदानीरूपी आशीर्वाद दिलेत ,त्याच आशीर्वादाची आता पुनरावृत्ती करण्याची गरज आहे. डॅडी नी जी जनतेची कामे केली आणि सेवा केली तोच अजेंडा मी पुढे घेऊन जनतेची सेवा करण्याचा वारसा जपणार असल्याचे योगिता गवळी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले होते.
advertisement

>> पुतणी विरुद्ध काकू

तर दुसऱ्या बाजूला अरुण गवळी यांची भावजय माजी नगरसेविका वंदना गवळी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर भायखळ्यात दोन गवळी समोरासमोर उभ्या ठाकणार हे स्पष्ट झालं. अरुण गवळींची भावजय वंदना गवळी यांनीही स्वतःहून आपली उमेदवारी घोषित केली. योगिता गवळींनी जाहीर केलेल्या प्रभागातून त्यांनी उमेदवारी जाहीर केली. वंदना गवळी या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
advertisement
२००७ आणि २०१२ साली अखिल भारतीय सेनेकडून २०४ प्रभागातून वंदना गवळी निवडून आल्या . त्यानंतर २०१७ साली प्रभाग रचनेत बदल झाला , यावेळी भाजपच्या सुरेखा लोखंडे यांनी वंदना गवळी यांचा पराभव केला . वंदना गवळी यांनी मात्र आता २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत अरुण गवळींच्या अखिल भारतीय सेनेची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.
advertisement

>> घरात फूट की राजकीय पक्षांची भिन्नता?

योगिता गवळी यांनी या आधी कोणतीही निवडणूक लढविलेली नाही, पण यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर करत २०७ प्रभाग म्हटलय . यंदा प्रभाग आरक्षण सोडतीत २०७ प्रभाग सर्वसाधारण प्रभाग घोषित झाला आहे. अरुण गवळींच्या अभासेची साथ सोडल्याने की पारिवारिक अंतर्गत कलहाने वंदना सेनेत गेल्या, आणि एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत हे अद्याप स्पष्ट नाही. पण या परस्पर विरोधात केलेल्या घोषणेने भायखळावासीय आवक झालेत . त्यामुळे या सगळ्यात अरुण गवळी काही मध्यस्थी करणार का , हा महत्वाचा मुद्दा आहे .
advertisement

>> पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार?

२०७ प्रभागात २०१७ च्या निवडणुकीत भाजपच्या सुरेखा लोखंडे यांनी विजय मिळवला होता. याच मतदारसंघात भाजपचा उमेदवार पुन्हा असेल . तर दुसऱ्या बाजूला वंदना यांनी शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केल्याने हा मतदारसंघ राखायचा की उमेदवारांची समजूत काढायची ही तारेवरची कसरत पक्ष श्रेष्ठींना करावी लागणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Arun Gawli BMC: मांडवली की फूट पडणार? डॅडीच्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?
Next Article
advertisement
Arun Gawli BMC: मांडवली की फूट पडणार? डॅडीच्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?
'डॅडी'च्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?
  • 'डॅडी'च्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?

  • 'डॅडी'च्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?

  • 'डॅडी'च्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?

View All
advertisement