advertisement

Rupali Chakankar : रूपाली चाकणकरांच्या बोटाला दुखापत कशी झाली? धायरीतील अध्यक्षाचा video, तटकरेंसारखाच सेम टू सेम दावा

Last Updated:

Rupali Chakankar : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या नादाला लागून चाकणकर यांनी अनामिका कापल्याचे अंधारे म्हणाल्या होत्या. चाकणकर यांच्या याच फोटोवरून महाराष्ट्रात गजहब निर्माण झाला होता.

रूपाली चाकणकरांच्या बोटाला दुखापत कशी झाली? धायरीतील अध्यक्षाचा video, तटकरेंसारखाच सेम टू सेम दावा
रूपाली चाकणकरांच्या बोटाला दुखापत कशी झाली? धायरीतील अध्यक्षाचा video, तटकरेंसारखाच सेम टू सेम दावा
Rupali Chakankar Ashok Kharat Case:  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी तंत्र मंत्र आणि पूजा करताना आपल्या बोटाची अनामिका कापल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपांना धायरीमधील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा व्हिडिओ पोस्ट करत रुपाली चाकणकर यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. गाडीच्या दरवाज्यात बोट अडकल्याने दुखापत झाल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे.
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन रूपाली चाकणकर यांनी अनामिका कापल्याचा गंभीर आरोप केला होता. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या नादाला लागून चाकणकर यांनी अनामिका कापल्याचे अंधारे म्हणाल्या होत्या. चाकणकर यांच्या याच फोटोवरून महाराष्ट्रात गजहब निर्माण झाला होता.

वायरल फोटोंवर चाकणकरांचे स्पष्टीकरण

रूपाली चाकणकर यांनी धायरीमधील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत संबंधित व्यक्ती सांगत आहे की रूपाली चाकणकर प्रत्येक वर्षी आमच्या गणेश मंडळाच्या आरतीला येतात. यंदाही त्या आरतीला आल्या असता गाडीतून उतरताना त्यांचे बोट दरवाज्यात अडकून त्यांना दुखापत झाली. टिश्यू पेपरने जखम कोरडी करून त्यांनी गणपती बाप्पाची आरती पूर्ण केली. हा संपूर्ण प्रकार तुम्हाला आमच्या मंडळाच्या सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळेल, असा दावा गणेश मंडळाचा अध्यक्ष करीत आहे. तसेच रूपाली चाकणकर यांच्यावर होणारे आरोप वैयक्तिक स्वरूपाचे असून फोटोंबाबत ध चा मा करणारे आहेत, असे व्हिडिओमध्ये गणेश मंडळाचा अध्यक्ष सांगतो आहे.
advertisement
advertisement
रूपाली चाकणकर यांनी हाच व्हिडिओ आपल्या समाज माध्यमांवर शेअर करत सुषमा अंधारे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
गेली 20-22 वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करताना जसजसा प्रगतीचा आलेख वाढत गेला तस तशी चिखलफेक करण्याची विकृती वाढत गेली. प्रत्येक वेळी संयमाने शांतपणे टीका सहन केली, वैयक्तिक टीका करणे हे माझ्या रक्तातच नाही. पण आता सगळ्या मर्यादा ओलांडून माझ्यासह कुटुंबाला जो त्रास दिला जातो ते भीतीदायक आहे, ज्यांनी हा आयुष्याचा प्रवास जवळून पाहिला ते सर्व संपर्क करून आम्ही सोबत आहोत हे आवर्जून सांगत आहेत. खरात प्रकरणात मी पहिल्या दिवशीच भूमिका स्पष्ट केली आहे की तपास निष्पक्षपणे व्हावा, यासाठी आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतरही माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुराव्यासह स्पष्टीकरण दिले आहे, सत्य समोर येईलच.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rupali Chakankar : रूपाली चाकणकरांच्या बोटाला दुखापत कशी झाली? धायरीतील अध्यक्षाचा video, तटकरेंसारखाच सेम टू सेम दावा
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement