Double Decker Bus : मुंबईनंतर आता ठाण्याचा नंबर! शहरात धावणार डबल डेकर बस; पाहा कधीपासून सुरू होणार सेवा
Last Updated:
Double Decker Bus : ठाणे शहरात पुढील काही महिन्यांत दुमजली बस सेवा सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
ठाणे : ठाणे शहरात लवकरच प्रवाशांना डबल डेकर बसने प्रवास करता येणार आहे. मात्र हा प्रवास नेमका कधी सुरू होणार आणि ही बस पहिल्यांदा कोणत्या मार्गावर धावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणेकरांचा प्रवास आता 'लंडन' स्टाईल
मुंबई महापालिकेच्या पद्दतीप्रमाणे ठाणे शहरात डबलडेकर बस धावतील. या डबलडेकर बस येत्या सहा महिन्यांत टीएमटीच्या ताफ्यात दाखल होतील ही माहिती सोमवारी सादर केलेल्या ठाणे परिवहन उपक्रमाच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्याती आली होती. मात्र या डबलडेकर बस शहरातील कोणत्या मार्गावर धावतील याबाबत प्रशासनाने स्पष्ट सांगितले नाही.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचा 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता 791 कोटी 86 लाखांचा अर्थसंकल्प हा सोमवारी व्यवस्थापक भालचंद्र बेहेर यांनी पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेपुढे मांडला. पुणे शहरातील सीआयआरटी संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जर 1 लाख लोकसंख्या असल्यास किमान 50 बस असणे गरजेचे आहे आणि सध्या ठाण्याची लोकसंख्या ही 27 लाख इतकी आहे तर शहरास 1,350 बसेसची गरज आहे. सध्याच्या स्थितीला शहरात जवळपास तीन लाख जण दररोजचा प्रवास करतात मात्र शहरात 467 बसेस आहे. हेत सीआयआरटी संस्थेच्या तत्त्वानुसार ही बसेसची संख्या कमी असल्याचे अर्थसंकल्पात सांगण्यात आले.
advertisement
प्रथम ठाणे परिवहन उपक्रमातील बसची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. ज्यात पीएम ई बस योजनेतून 100 एसी विद्युत बस, शंभर सीएनजी तसेत 15 व्या वित्त आयोगातून 160 वातानुकूलित विद्यात बस अशा पूर्ण 370 बसची खरेदी करण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे यात 10 डबलडेकर बसचाही समावेश असणार असून या बस खरेदीच्या प्रस्तावाला मान्यताही मिळाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 10:00 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Double Decker Bus : मुंबईनंतर आता ठाण्याचा नंबर! शहरात धावणार डबल डेकर बस; पाहा कधीपासून सुरू होणार सेवा









