advertisement

बाशिंग बांधण्यापूर्वीच रिक्षाचालकाचा तलावात दुर्दैवी अंत; मित्रही बेपत्ता, सोलापुरातील घटना

Last Updated:

हिप्परगा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा अद्याप बेपत्ता आहे. तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी घडली.

News18
News18
सोलापूर : आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी लग्नाची स्वप्ने डोळ्यांत घेऊन जगणाऱ्या एका तरुणाचा जीव पाण्याने हिरावून घेतला आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हिप्परगा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा अद्याप बेपत्ता आहे. तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी घडली. भारत शिवशंकर सुरवसे वय 28, राहणार जोशी गल्ली, शेळगी असे मृत तरुणाचे नाव आहे, तर त्याचा मित्र गिरीश माळगे राहणार शेळगी हा बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे.
भारत हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सोबतच तो पोलीस भरतीचीही तयारी करत होता. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत रिक्षा चालवल्यानंतर, तो शेळगी परिसरातील चौकात रिक्षा लावून मित्र गिरीश माळगेसोबत हिप्परगा तलाव परिसरात गेला. उन्हाचा कडाका असल्याने तलावातील पाणी पाहून दोघांनाही पोहण्याचा मोह झाला. कपडे काठावर काढून दोघांनीही पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात बुडाले.
advertisement
तलावाच्या काठावर कपडे पाहून नागरिकांनी संशय घेतला आणि मोबाइल क्रमांकावरून नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने सायंकाळी सहाच्या सुमारास भारतला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. भारतचे पुढील महिन्यात लग्न ठरले होते, त्यामुळे सुरवसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
भारतसोबत असलेला गिरीश माळगे अद्यापही बेपत्ता आहे. अंधार पडल्यामुळे सोमवारी सायंकाळी शोध मोहीम थांबवण्यात आली. मंगळवारी सकाळी पुन्हा शोधकार्य हाती घेण्यात येणार आहे. भारतच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे, तर त्याचे वडील यार्डात भाजी विक्रीचे काम करतात. या घटनेमुळे शेळगी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
बाशिंग बांधण्यापूर्वीच रिक्षाचालकाचा तलावात दुर्दैवी अंत; मित्रही बेपत्ता, सोलापुरातील घटना
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement