Shocking Incident : बापाने लेकीचा मोबाईल तपासला आणि होत्याचं नव्हतं झालं; पिंपरीतील घटनेने सर्वजण सुन्न
Last Updated:
Pimpri Shocking Incident : घरातील एखादी लहान घटना किती मोठ्या टोकाचे निर्णय घेण्यास अनेकदा भाग पाडते, हे सध्या पिंपरीतून समोर आलेल्या घटनेत दिसत आहे. जिथं वडिलांनी केलेल्या एका कृतीमुळे घरातल्याच मुलीनं टोकाचा निर्णय घेतला आहे.
पिंपरी : मुलांवर लक्ष ठेवणं हे प्रत्येक पालकांचे कर्तव्य असते. अनकेदा पालक मुलांच्या भल्यासाठी त्यांना मुलांना ओरडतही असतात किंवा त्यांच्या वागण्या-बोलण्यावरही लक्ष ठेवतात, पण बऱ्याचदा मुलांना पालकांची केलेली कृती आवडत नाही आणि त्यातून मुलं टोकाची पावले उचलतात. सध्या अशीच एक दुर्देवी घटना समोर आलेली आहे. जिथे एका 16 वर्षीय मुलीने असं काही केलं की सर्वजण हादरुन गेलेले आहे.
मोबाईल चेक करणं जिवावर बेतले
मिळालेल्या माहितीनुसार, ही घडलेली घटना चिखली येथील जाधववाडी येथील आहे. जिथं एक कुटुंब आपल्या 16 वर्षीय मुलीसह गेल्या काही काळापासून वास्तव्यास होते. पण 22 मार्च आधी मुलगी घरात असताना वडिलांनी सहज तिचा मोबाईल तपासण्यासाठी मागितला आणि तो तपासला. वडिलांनी मोबाईल तपासल असल्याचा राग या मुलीला आला आणि तिने रागाच्या भरात विश प्राशन केले.
advertisement
या प्रकरानंतर तिला तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरुही केले. मात्र मुलीची प्रकृती गंभीर असल्याने 22 मार्च रोजी तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अचनाक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 9:21 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Shocking Incident : बापाने लेकीचा मोबाईल तपासला आणि होत्याचं नव्हतं झालं; पिंपरीतील घटनेने सर्वजण सुन्न










