'अशोक खरात इतक्या देशांमध्ये फिरला, पळून जाण्याचीही होती भीती', मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला अटकेचा प्लॅन!
- Published by:Sachin S
Last Updated:
अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेत पाहण्यास मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी निवेदन सादर केलं.
मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राचं समाजमन ढवळून निघालं आहे. रोज या प्रकरणी नवनवीन खुलासे होत आहे. अखेरीस या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणी सविस्तर निवेदन दिलं आहे. तसंच, अशोक खरात याने कोणत्या देशामध्ये प्रवास केला याची कुंडलीच समोर आली आहे. अशोक खरातने अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, साउथ आफ्रिका, इथोपिया, टान्झानिया, केनिया, इंडोनेशिया, मलेशिया, यूई, केनिया, पेरू आणि युगांडा या देशामध्ये प्रवास केला आहे. अशोक खरातच्या नावावर असलेली प्रॉपर्टी मागवण्यात आली आहे, त्याबद्दल तपास केला जात आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेत पाहण्यास मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी निवेदन सादर केलं. "नाशिक पोलिसांनी अशोक खरात याला अटक केले. घराच्या आसपास चोरी झाल्याचे सांगून त्याला घराबाहेर पडण्यास भाग पाडलं आणि नंतर त्याला ताब्यात घेतलं. अटक कारवाईची कुणकुण अशोक खरात याला लागली असती तर परदेशात पळून गेला असता. ही शक्यता दाट होती, त्यामुळे आम्ही आधीच त्यासंबंधीची खरबरदारी घेतली आणि त्याला पोलिसांनी अटक केलं, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
advertisement
अशोक खरात विरोधात ५ महिलांनी दिली तक्रार
अशोक खरातविरोधाात ५ महिलांनी आतापर्यंत तक्रार दिली आहे. चार पीडित महिलांनी भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदवल्या आहेत. अशोक खरात याची विशेष पोलीस पथकाकडून चौकशी सुरू आहे. चौकशीत त्याने अनेक महिलांवर शारीरिक अत्याचार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. महिला भक्तांच्या धार्मिक श्रद्धेशी आणि भावनांशी खेळून त्याने महिलांवर अत्याचार केले. सुरुवातीला त्याच्याविरोधात तक्रार करायला महिला पुढे येत नव्हत्या. मात्र त्यानंतर पोलिसांनी समुपदेशन करून आणि तक्रारदारांना ओळख उघड न होण्याचे आश्वस्त करून तक्रारी देण्यास सांगितलं. आतापर्यंत खरातविरोधात सहा तक्रारी आल्या असून पोलीस चौकशी सुरू आहे" अशी माहिती फडणवीस यांनी दिली,
advertisement
योगेश भालेरावने दिले ३५ व्हिडीओ
"नाशिक पोलिसांनी अतिशय गुप्तपणे आणि चाणाक्षपणे अशोक खरात याच्यावर बुधवारी रात्री अटकेची कारवाई केली. पोलीस महासंचालकांच्या निर्देशानंतर संवेदनशील आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष पोलीस पथक खरातची चौकशी करीत आहे. खरात याच्या कार्यालयात काम करणाऱ्या नीरज जाधव याने पोलिसांना संबंधित व्हिडीओ दिल्याचे आतापर्यंत मानले जात होते. मात्र योगेश भालेराव या व्यक्तीने आठ महिलांचे ३५ व्हिडिओ दिले आहे. त्यानंतर पुढे कारवाई करण्यात आली आहे. साक्षीदार योगेश भालेराव याला पोलिसांचं संरक्षण देण्यात येईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.
advertisement
गुंगीचं औषध आणि महिलांवर बलात्कार करायचा
अशोक खरात हा पीडित महिलांना आपल्या कार्यालयामध्ये बोलावयचा. तिथे महिलेला गुंगीचं औषध द्यायचा, तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन अशी धमकी देऊन बलात्कार करायचा. अशोक खरात हा महिलांना संमोहित करायचा. विधीच्याा नावाखाली तो महिलांच्या पोटावर हात फिरवायचा, प्राईव्हेट पार्टमध्ये बोट घालायचा. तिर्थ देण्याच्या नावाखाली लघवी पाजायचा. पोलिसांनी अशोक खरातच्या कार्यालयावर छापा टाकला तेव्हा ६ लाख रोख आणि दोन लॅपटॉप जप्त केले. डीव्हीआर, रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसे, फायर केलेले ५ काडतुसं जप्त केली आहे. खरातकजे ३३ एकर जमीन, फार्म हाऊस आणि इतर ठिकाणी जमिनी, फ्लॅट, पनवेलमध्ये ४० गुंढे जमीन, मुलींच्या नावावर पुण्यात फ्लॅट, सिन्नरमध्ये मंगल कार्यालय जप्त करण्यात आलं आहे. आतापर्यंत ४० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्याच्याकडे आणखी संपत्ती आढळण्याची शक्यता आहे. याबद्दल पोलीस तपास करत आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 24, 2026 5:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'अशोक खरात इतक्या देशांमध्ये फिरला, पळून जाण्याचीही होती भीती', मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला अटकेचा प्लॅन!










