advertisement

नाशिक कोर्टाबाहेर थरार! भोंदू खरातला पाहताच नागरिक भडकले, गाडीवर हल्ला

Last Updated:

500 महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या सैतानाला आमच्या स्वाधीन करा, अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली होती

News18
News18
नाशिक :   नाशिक जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या पापकर्मांचा पाढा आता न्यायालयासमोर वाचला जात असून, या नराधमाचा संतापजनक चेहरा पाहून जनसामान्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे. मंगळवारी खरातला न्यायालयात हजर केले जात असताना संतप्त नागरिकांनी त्याच्या पोलीस वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न केला.
स्वता: ला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या आणि प्रत्यक्षात वासनांध आणि  भूमाफिया असलेल्या अशोक खरात याच्यावर अखेर कायद्याचा फास आवळला जात आहे. खरातची पोलीस कोठडी संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाच्या बाहेर जमलेल्या शेकडो नागरिकांनी खरात ज्या पोलीस वाहनात होता, त्यावर धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 500 महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या सैतानाला आमच्या स्वाधीन करा, अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र परिसरातील वातावरण प्रचंड तापलेले होते.
advertisement

खरातविरोधात दाखल गुन्ह्यांची संख्या 6 वर  

आज न्यायालयात सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकून सर्वांच्याच अंगावर शहारे आले. खरातने केवळ महिलांचे शोषण केले नाही, तर त्याने 'नरबळी' दिल्याचा प्रबळ संशय सरकारी वकिलांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयाने खरातची 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. आतापर्यंत खरातविरोधात दाखल गुन्ह्यांची संख्या 6 वर पोहोचली असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement

नेमकं काय म्हणाले ग्रामस्थ? 

न्यायालय परिसरात जमलेल्या ग्रामस्थांनी खरातच्या 'ब्रँडिंग'वर आणि त्याच्या राजकीय संबंधांवर कडाडून टीका केली.  मोठ्या पदावरील व्यक्ती आणि राजकारण्यांच्या पाठिंब्यामुळेच हा भोंदू इतका मोठा झाला. त्याने स्वतःची प्रतिमा उभी केली आणि त्याआधारे शेकडो महिलांना जाळ्यात ओढले. त्याचे मोठे लागेबांधे असल्याने तो सुटून बाहेर येईल आणि पुन्हा आम्हाला धमकावेल,  अशी भीती पीडितांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. अनेक महिलांचा लैंगिक छळ आणि जमिनी लाटण्याचे प्रकार खरातने धाक दाखवून केल्याचे आता उघड होत आहे.
advertisement

खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला आज नाशिक सत्र न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातची आज पोलीस कोठडीची मुदत संपली होती. त्यामुळे आज दुपारी 3.50 वाजता अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. आतापर्यंत तपासात काय निष्पन्न झाले, याबाबतीत पोलिसांकडून न्यायालयात माहिती दिली. तसेच पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिक कोर्टाबाहेर थरार! भोंदू खरातला पाहताच नागरिक भडकले, गाडीवर हल्ला
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement