नदी मंजूर, धरण मंजूर, डोंगर मंजूर... एकनाथ शिंदे यांच्या 'फोन स्टाईल'ची खिल्ली, थोरातांचे बोचरे वार

Last Updated:

स्थानिक प्रश्नांवर नागरिकांच्या मागणीनंतर एकनाथ शिंदे यांनी थेट मंत्री उदय सामंत आणि मंत्री प्रकाश आबिटकर यांना फोन लावून तत्पर उपमुख्यमंत्री असल्याचे कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

बाळासाहेब थोरात-एकनाथ शिंदे
बाळासाहेब थोरात-एकनाथ शिंदे
संगमनेर, अहिल्यानगर : संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात आले असताना प्रचारातील त्यांच्या विशेष 'फोन ऑर्डरची' काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मिश्किल शैलीत खिल्ली उडवली. संगमनेरमधील एमआयडीसीचा प्रश्न आणि रुग्णालयाच्या दुरावस्थेवरून त्यांनी संबंधित दोन्ही खात्यांच्या मंत्र्‍यांना फोन लावून तत्काळ आदेश दिले. हाच धागा पकडून बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटे काढले. जिथे जाईल तिथे मंत्र्‍यांना फोन लावून हे मंजूर ते मंजूर करतायेत, निवडणुकीत असे स्टंट करायला लागतात पण त्यालाही काही मर्यादा असते, असे थोरात म्हणाले.
संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या पॅनेलच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे संगमनेरमध्ये आले होते. विधानसभेला जसे अमोल खताळ यांना जायंट किलर ठरवले तसेच आताही रेकॉर्डब्रेक मतकान करून आमच्या सेनेच्या पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. स्थानिक प्रश्नांवर नागरिकांच्या मागणीनंतर त्यांनी थेट मंत्री उदय सामंत आणि मंत्री प्रकाश आबिटकर यांना फोन लावून तत्पर उपमुख्यमंत्री असल्याचे कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न केला. एका फोनवर कामे होतात, असे बिंबवण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांच्या याच कृतीवर बाळासाहेब थोरात यांनी बोचरे वार केले. एकनाथ शिंदे हे स्टंटबाजी करत असल्याचे सांगून विनोदी शैलीत त्यांच्यावर बोचरे वार केले. डॉ. मैथिली तांबे यांच्यासाठी थोरात यांनी प्रचारसभा घेतली.
advertisement

एकनाथ शिंदे यांच्या 'फोन स्टाईल'ची खिल्ली, थोरातांचे बोचरे वार

निवडणुकीत थोडी बनवाबनवी करावी लागते. तुम्हाला निवडणूक काळात फंडे करायची सवय आहे. पण संगमनेरची जनता हुशार आहे. शिंदे संगमनेरमध्ये आले होते, त्यावेळी शहरासाठी जे जे काही लागेल ते सगळे मंजूर होते. त्यांच्या भाषणातून हे मंजूर ते मंजूर असे त्यांनी सांगितले. लोक म्हणाले पाणी पाहिजे शिंदे म्हणतात धरण मंजूर, लोक म्हणतात धरण कसं होणार शिंदे म्हणतात नदी मंजूर, लोक म्हणतात नदी कशी होणार ते म्हणतात डोंगर मंजूर.. असे म्हणत मिश्किल शैलीत थोरात यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटे काढले.
advertisement

संगमनेरमध्ये सत्यजीत तुलाच काम करावे लागेल, इतरांना टोल नाक्याच्या वसुलीतून वेळ मिळत नाही

आमदारकी खासदारकी असताना तुमच्याने एक रस्ता धड होईना. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी नगर मनमाड रस्ता करून दाखवावा, असे आव्हान बाळासाहेब थोरात यांनी दिले. संगमनेरमध्ये सत्यजीत तुलाच काम करावे लागेल. इतरांना टोल नाक्याच्या वसुलीतून वेळ मिळत नाही, असा टोलाही थोरात यांनी लगावला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नदी मंजूर, धरण मंजूर, डोंगर मंजूर... एकनाथ शिंदे यांच्या 'फोन स्टाईल'ची खिल्ली, थोरातांचे बोचरे वार
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement