advertisement

काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल, पार्थ पवार यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना बिनविरोध देण्यावरून पार्थ पवार विरुद्ध काँग्रेस संघर्ष, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पार्थला परिपक्वतेचा सल्ला दिला.

सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे
एकीकडे पोटनिवडणुकीसाठी घमासान सुरू असताना बारामतीत मात्र पोटनिवडणुकीच्या चर्चेऐवजी वेगळ्याच कारणाने राजकारण ढवळून निघताना दिसत आहे. पार्थ पवार विरुद्ध काँग्रेस संघर्ष सुरू झाला आहे. बारामतीत होणारी पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी आणि महायुतीकडून आवाहन केलं. त्यानंतर आता शरद पवार गटानेही सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडणूक देण्यासाठी पाठिंबा दिला. हे सगळं सुरू असताना काँग्रेसनं मात्र पाठिंबा देण्याऐवजी आपला उमेदवार दिला. त्यानंतर मात्र पार्थ पवार विरुद्ध काँग्रेस असा वाद सुरू झाला.
पार्थ पवार यांनी काँग्रेसचा काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल असं म्हटल्यानंतर तिथून वादाची ठिणगी पडली. त्यानंतर काँग्रेसनेही पार्थ यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तर शरद पवार यांनी देखील पार्थला घरचा आहेर देऊन एका वाक्यात कान टोचले. यावर सुप्रिया सुळे यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्यांची प्रतिक्रिया विचारा, कौटुंबिक सल्ला तर घरात दिला जातो असं म्हणत विषयच फिरवला.
advertisement
पार्थ पवार काय म्हणाले?
लोक विसरत नाहीत. जे दादांचं प्रेम आहे लोकांच्या हृदयात होतं आणि आजही कायम आहे, अशावेळी एवढ्या मॅच्युअर पक्षाने असा निर्णय घेणं म्हणजे..., जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ, आम्ही काही कुणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिलं आहे, ते होईल. फक्त मला वाईट वाटतंय की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे.
advertisement
सुप्रिया सुळे यांची पार्थ पवार यांच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया
एकतर मला असं वाटतं की हा प्रश्न मला विचारण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आहे त्या नेत्यांना विचारावा. त्यांच्या एका खासदाराचं मत आहे. तर ते त्यांच्या पक्षाचं मत असावं. मला असं वाटतं की त्यांचं काय मत आहे हे मी बोलण्यापेक्षा त्यांच्या गटाने बोलणं जास्त योग्य आणि संयुक्तिक उत्तर मिळेल. राजकारणात परिपक्वता लागते असं शरद पवार म्हणाले होते. पार्थ पवार यांच्यात ती आहे की नाही हे मला माहिती नाही. आदरणीय पवार साहेब हे कर्तृत्व, वय आणि नात्यानी सगळ्याच बाबतीत माझ्यापेक्षा मोठे आहेत. ज्या संस्कारात मी वाढले त्यात आपल्यापेक्षा जी कोणी व्यक्ती मोठी असेल यांनी एकदा बोलल्यावर आपण त्यावर काहीच बोलायचं नसतं हे मला माझ्या घरच्यांनी शिकवलं आहे. कौटुंबिक सल्ला हा घरात द्यायचा असतो. तो इथे बोलण्याची ही वेळ नाही.
advertisement
शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्रात काँग्रेसचा डाउनफॉल होईल असं पार्थ पवार यांनी विधान केल्यानंतर त्यावर काँग्रेसनं बोचरी टीका केली आहे. तर दुसरीकडे बारामतीच्या राजकारणात पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं सुनेत्रा पवार यांनी भावनिक साद घातल्यानंतरही काँग्रेसनं आपल्या उमेदवार दिला. त्यानंतर पार्थ पवार विरुद्ध काँग्रेस असं नवीन राजकारण सुरू झालं आहे. या सगळ्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पार्थ पवार यांनी कोणत्याही प्रकारचं भाष्य करताना जबाबदारीने आणि तर्कसंग करायला हवं असा एक सल्ला त्यांनी नकळत दिला. मुळात त्यासाठी परिपक्वता लागते असं म्हणत त्यांनी पार्थ यांचे कान टोचले.
advertisement
काँग्रेसकडून पार्थ पवार यांच्यावर बोचरी टीका
धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने कॉंग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे ?
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल, पार्थ पवार यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement