advertisement

अजितदादांच्या विमान दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्ससंबंधी मोठी माहिती समोर, पोलीस स्टेशनला नोंद-४ अधिकाऱ्यांच्या सह्या!

Last Updated:

विमान अपघातानंतर सापडलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षित अवस्थेत बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अजितदादांच्या विमानाला अपघात
अजितदादांच्या विमानाला अपघात
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या बातम्या आल्या. यावरती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही आक्षेप नोंदवला होता. मात्र आता दादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सुस्थितीत असल्याची नोंद बारामती तालुका स्टेशनला असल्याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळापासून काही मीटर अंतरावर अपघात झाला. कमी दृश्यमानता आणि विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे डीजीसीएने विमान कंपनीकडे बोट दाखवून सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून कंपनीशी संबंधित विमानांच्या उड्डाणांना बंदी घातली आहे. तसेच अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भाने सीबीआय चौकशी देखील होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यासंबंधी पत्रही लिहिले आहे.
advertisement

ब्लॅक बॉक्स 'सेफ' मध्ये?

विमान अपघातानंतर सापडलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षित अवस्थेत बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, Aircraft Accident Investigation Bureau म्हणजेच AIB चे अधिकारी के. रामचंद्र यांनी 19 जानेवारी 2026 रोजी दुपारी दोन वाजता या ब्लॅक बॉक्सची पाहणी करून तो सुरक्षित असल्याची नोंद केली होती. इतकेच नाही, तर बॉक्सवर चारही बाजूंनी अधिकाऱ्यांच्या सह्या करण्यात आल्याची आणि स्टेशन डायरीमध्ये ऑनलाईन नोंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
https://youtu.be/Z26LU7Wi8AU

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका

अजित पवार यांच्या कथित अपघाती मृत्यूच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. अपघाताच्या सखोल तपासासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन करण्याची मागणी त्यांनी जनहित याचिकेतून केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांच्या विमान दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्ससंबंधी मोठी माहिती समोर, पोलीस स्टेशनला नोंद-४ अधिकाऱ्यांच्या सह्या!
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement