advertisement

संशयाचं भूत बेतलं जीवावर! मूल पळवण्याच्या संशयातून जमावाकडून तरुणाचा बळी

Last Updated:

30 ते 35 वर्षाच्या एका अनोळखी तरुणास जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

News18
News18
जळगाव:   जळगाव शहरालगत आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंगजवळ घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. लहान मुलाला पळवून नेण्याच्या संशयावरून 30 ते 35 वर्षाच्या एका अनोळखी तरुणास जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, एका तीन वर्षीय बालकाला पळवून नेत असल्याचा संशय व्यक्त करत सुमारे 10 ते 15 जणांच्या जमावाने संबंधित तरुणास अडवले. कोणतीही खातरजमा न करता जमावाने त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळातच मारहाणीचे स्वरूप गंभीर बनले आणि तरुण बेशुद्धावस्थेत खाली कोसळला. घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जमावाला पांगवत जखमी तरुणास तातडीने रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
advertisement

मयताची ओळख पटविण्याचे काम सुरू

याप्रकरणी मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा खुर्द), अजय डोंगर कोळी (रा. थोरगव्हाण), प्रशांत उर्फ प्रकाश शशिकांत सोनवणे, अजय उर्फ बादल शशिकांत सोनवणे (दोन्ही रा. बामणोद) व अफताब आरीफ खाटीक (रा. कुंभारवाडा, शनिपेठ, जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. पोहेकॉ श्रीकांत बदर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून इतरांचा शोध सुरू आहे. दरम्यान, मृत्यूपूर्वी जबाब घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तो बोलण्याच्या स्थितीत नसल्याने जबाब घेता आला नाही. त्यामुळे त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, मयताची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
advertisement

कठोर कारवाईची मागणी

या घटनेमुळे संशयावरून न्याय या मानसिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, कायदा हातात घेणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही संशयास्पद घटनेत स्वतःहून कारवाई न करता तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, अन्यथा अशा घटनांमुळे निरपराधांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संशयाचं भूत बेतलं जीवावर! मूल पळवण्याच्या संशयातून जमावाकडून तरुणाचा बळी
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement