सोलापुरात 11 वीच्या विद्यार्थ्यासोबत अमानुष कृत्य, 3 तास डांबलं, चौघांनी स्टम्पने केली मारहाण
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शीत एका महाविद्यालयात ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी खोलीत डांबून क्रिकेटच्या स्टम्पने बेदम मारहाण केली.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. बार्शीच्या उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी खोलीत डांबून क्रिकेटच्या स्टम्पने बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत विद्यार्थ्याचा एक कान निकामी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिक बनसोडे असं पीडित विद्यार्थ्याचं नाव आहे. प्रसिक हा उक्कडगाव येथील महाविद्यालयात ११ वीत शिक्षण घेत आहे. गुरुवारी रात्री चार सिनीयर विद्यार्थी त्याच्या खोलीत घुसले. त्यांनी प्रसिकला खोली स्वच्छ करण्यास आणि झाडू मारण्यास सांगितले. पण प्रसिकने ही कामं करण्यास नकार दिला. यानंतर चारही विद्यार्थ्यांनी प्रसिकला अमानुष मारहाण करायला सुरुवात केली.
advertisement
३ तास खोलीत डांबून मारहाण
पीडित प्रसिकने केलेल्या आरोपानुसार, आरोपी विद्यार्थ्यांनी त्याला तब्बल तीन तास खोलीत कोंडून ठेवलं होतं. या दरम्यान क्रिकेटच्या स्टम्पने त्याला शरीरावर ठिकठिकाणी जबरी मारहाण केली. ही मारहाण इतकी भीषण होती की, प्रसिकचा एक कान निकामी झाला असून त्याला आता एका कानाने ऐकू येत नाहीये. मारहाण करत असताना आरोपींनी मद्य प्राशन केलं होतं, असा आरोपही प्रसिकने केला.
advertisement
एवढी मोठी घटना घडूनही महाविद्यालय प्रशासनाने अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केली नाही. उलट, महाविद्यालय प्रशासन या दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप पीडित विद्यार्थ्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती सध्या गंभीर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 1:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापुरात 11 वीच्या विद्यार्थ्यासोबत अमानुष कृत्य, 3 तास डांबलं, चौघांनी स्टम्पने केली मारहाण









