गौतमी पाटील खरं बोलली, पण ही लावणी डान्सर निघाली खोटारडी? 'Bigg Boss Marathi'च्या घरातनं मोठी बातमी
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss Marathi Season 6 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातनं एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीचे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'बिग बॉस मराठी सीझन 6' हा छोट्या पडद्यावरील बहुप्रतीक्षित वादग्रस्त कार्यक्रम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या कार्यक्रमाची 'बिग बॉस'चे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या 11 जानेवारीपासून या नव्या सीझनची सुरुवात होत आहे. दरम्यान या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असणार हे जाणून घेण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
advertisement
advertisement
एबीपीला दिलेल्या मुलाखतीत 'बिग बॉस मराठी'एन्ट्रीबाबत होत असलेल्या चर्चांबाबत गौतमी पाटील म्हणालेली,"बिग बॉस मराठी'साठी मला विचारणा झाली होती. मागच्या सीझनसाठीदेखील मला विचारलं होतं. 'बिग बॉस'चा खेळ खूप छान आहे. 'बिग बॉस'मध्ये गेल्यावर लोकांचं करिअर होतंच असं नाही. पण माझं न जाण्याचं कारण वेगळं होतं".
advertisement
advertisement
advertisement
सायली पाटीलचा 'बिग बॉस मराठी'बाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सायली पाटील म्हणतेय,"मला दोन दिवसांपूर्वी मेल आला आलाय. मी काय करू तुम्ही सांगा. इंटरेस्टेड आहात का? असा मला मेल आलाय. मी 'बिग बॉस मराठी'त जायला हवं की नको? तुमचं काय मत आहे यावर ते मला कमेंट करुन नक्की सांगा. मला माहिती नाही मी कशी दिसते?
advertisement
advertisement









