Beed: संतोष देशमुखांच्या हत्येचं नवं कनेक्शन समोर, जितेंद्र आव्हाडांनी निवडणुकीतील 'तो' मुद्दा बाहेर काढला
- Published by:Prachi Amale
Last Updated:
संतोष देशमुखांच्या हत्येचं नवं कनेक्शन समोर आले आहे. निवडणुकीशी त्याचा संबंध असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड तुरुंगात आहे. देशमुखांची हत्या करणारे आरोपी कराडशी संबंधित आहेत. त्यामुळे कराडच या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. सीआयडीने वाल्मिक कराडचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार यांनी मोठा दावा केला आहे. संतोष देशमुखांची हत्या इलेक्शन फंडमुळे झाली, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, इलेक्शन फंडमुळे महाराष्ट्रात झालेली जी काही लफडी त्याच्यातली बीडचे प्रकरण एक आहे. संतोष देशमुख प्रकरण बीडच आहेत ते इलेक्शन फंडाचे आहेत. जी काही दोन कोटीची वसुली आहे. ती इलेक्शन फंडाची वसुली आहे.
तीन आरोपी फरार
संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. या तिन्ही आरोपींचा शोध सुरू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार आहेत. ल्मिक कराडसाठी हे काम करत असल्याचे म्हटले जात आहे. आता या प्रकरणातील खंडणीचा गुन्हा दाखल असलेला वाल्मिक कराड हा सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर आता या मुख्य आरोपींचा शोध सुरू झाला आहे. या प्रकरणातील मुख्य तीन आरोपींना पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केले आहे.
advertisement
काय आहे खंडणीचे प्रकरण?
मस्साजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे यांनी फोन करत वाल्मीकअण्णा बोलणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबत धमकी दिली. तसेच दुपारी सुदर्शन घुले याने कार्यालयात जात पुन्हा काम बंद करण्याची धमकी दिली. तसेच हातपाय तोडण्याची देखील धमकी दिली. पवनऊर्जा कंपनीकडून तब्बल 2 कोटींची खंडणी उकळण्याच्या प्रकरणात विष्णू चाटे सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. तिथे त्याची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत त्याने वाल्मीक कराडने आपल्या फोनवरून पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी खंडणीसंदर्भात बोलणी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) कोर्टात सादर केलेल्या प्राथमिक अहवालाद्वारे हा खुलासा झाला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 03, 2025 5:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed: संतोष देशमुखांच्या हत्येचं नवं कनेक्शन समोर, जितेंद्र आव्हाडांनी निवडणुकीतील 'तो' मुद्दा बाहेर काढला


