"तुझा मुळशी पॅटर्न करणार", बीडमध्ये वाढदिवशीच व्यापाऱ्यावर कत्तीने हल्ला, घटना CCTVत कैद

Last Updated:

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई शहरालगतच्या मगरवाडी येथे एका तरुण व्यापाऱ्यावर लोखंडी कत्तीनं वार करून जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना १९ सप्टेंबर रोजी घडली.

News18
News18
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई शहरालगतच्या मगरवाडी येथे एका तरुण व्यापाऱ्यावर लोखंडी कत्तीनं वार करून जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना १९ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "आज माझा वाढदिवस आहे, तुझा मुळशी पॅटर्न करणार" असे म्हणत हा हल्ला करण्यात आला. दीड वर्षांपूर्वीच्या वादातून ही घटना घडली.
गोपाल भागवत जाधव (२६, रा. मगरवाडी, ता. अंबाजोगाई) असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. ते माऊली अॅग्रो एजन्सी नावाचे कृषी साहित्याचे दुकान चालवतात. १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ते आपल्या दुकानासमोर खुर्चीवर बसले असताना जयपाल अशोक माने व त्याचा साथीदार निशांत विष्णू जागिर हे दोघे तेथे आले. त्यावेळी माने याने कपड्यात लपवलेली लोखंडी कत्ती काढून जाधव यांच्या मानेवर हल्ला केला.
advertisement
जाधव यांनी डावा हात वर केल्याने कत्तीचे वार बरगड्यांवर व हातावर बसले. गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी कसाबसा जीव वाचवत पळ काढला.
दोन्ही आरोपींनी मोटारसायकलवरून पाठलाग करत 'आज माझा वाढदिवस आहे, तुझा मुळशी पॅटर्न केल्याशिवाय राहणार नाही, तुला जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी दिली. हा हल्ला दीड वर्षापूर्वीच्या जुन्या वादातून केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी जयपाल अशोक माने व निशांत विष्णू जागिर या दोघांविरुद्ध जीव घेण्याचा प्रयत्न व धमकी यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रंगनाथ जगताप हे करत आहेत.
advertisement

घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

व्यापाऱ्याला कत्तीने मारहाण करतानाचा थरार दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यात आरोपी हा दुकानाबाहेर बसलेल्या व्यापाऱ्यावर अचानक येऊन कसा हल्ला करतो हे स्पष्ट दिसत आहे. १० ते १५ सेकंदांतच त्याने हा जीवघेणा हल्ला केला. हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
"तुझा मुळशी पॅटर्न करणार", बीडमध्ये वाढदिवशीच व्यापाऱ्यावर कत्तीने हल्ला, घटना CCTVत कैद
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement