दुबईत भारतीय अभिनेत्याच्या घराजवळ Missile! धमाक्यांनी हादरलं संपूर्ण घर; भयावह VIDEO
- Published by:Priya Lad
Last Updated:
India Actot in Dubai Attack : दुबईत असलेल्या एका भारतीय अभिनेत्याने दुबईतून एक भयानक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मिसाईल अटॅकच्या धमाक्यांनी त्याचं संपूर्ण घर, कुटुंब हादरलं आहे.
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीची दुबईला झळ पोहोचली आहे आणि याचा परिणाम भारतीयांवरही झालेला दिसतो आहे. दुबईत शूटिंगसाठी गेलेली एक भारतीय अभिनेत्री दुबई विमानतळावर अडकली, तिने ट्विट करत भारत सरकारकडे मदत मागितली. यानंतर आता भारतीय अभिनेत्याच्या घराजवळच मिसाईल दिसलं आहे. मिसाईलच्या आवाजांनी त्याचं संपूर्ण घर हादरलं आहे.
दुबईत असलेल्या एका भारतीय अभिनेत्याने दुबईतून एक भयानक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्याच्या घराजवळून हवेत फेकले जाणारे मिसाईल दिसत असल्याचा दावा त्याने केला आहे. या हल्ल्याच्या आवाजांनी त्याचंं संपूर्ण घर हादरलं आहे, त्याचंं कुटुंब खूप घाबरलेलं असल्याचं त्याने सांगितलं.
advertisement
हा अभिनेता आहे विष्णू मंचू. तेलुगू स्टार विष्णू आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी दुबईला गेला. तिथून त्याने तिथं सुरू असलेल्या संघर्षाची एक भयानक झलक शेअर केली. व्हिडिओमध्ये त्याने हवेतून एक एक क्षेपणास्त्र उडताना पाहिल्याचा दावा केला.
पोस्टमध्ये त्याने सांगितलं की, "मी दुबईमध्ये कुटुंबाला भेटायला आलो आहे. मला आकाशात मिसाईल्स स्पष्ट दिसत आहेत. मोठ्या स्फोटांनी आमचं घर हादरलं आणि लहान आयरा घाबरली. मी शांतीसाठी प्रार्थना करतो. कोणत्याही मुलावर अशी वेळ येऊ नये की त्याला त्याच्या छतावरून युद्धाचा आवाज ऐकत मोठं व्हावं लागेल"
advertisement
In Dubai visiting family tonight. Missiles visible in the sky. The loud interceptions shook our home and frightened little Ayra.
Praying for peace. No child anywhere should grow up hearing the sound of war above their roof.
Grateful to the UAE defense forces for keeping… pic.twitter.com/tCbE78eoBY
— Vishnu Manchu (@iVishnuManchu) February 28, 2026
advertisement
तसंच विष्णूने शांततेसाठी प्रार्थना करत नागरिकांचे रक्षण केल्याबद्दल यूएईच्या सैन्याचे आभारही मानले आहेत. तो म्हणाला, नागरिकांचं रक्षण केल्याबद्दल मी यूएई संरक्षण दलाचे आभार मानतो. असे क्षण आपल्याला आपलं जीवन किती नाजूक, क्षणिक आहे, याची जाणीव करून देतात. मी शक्ती आणि शांतीसाठी प्रार्थना करतो. हर हर महादेव."
दुबई विमानतळावर अडकली भारतीय अभिनेत्री
दुबईमधून येणारी-जाणारी विमानं रद्द झाली आहे. लाखो प्रवासी दुबईमध्ये अडकले आहे. यात अभिनेत्री सोनम चौहानही आहे. जी शूटिंगसाठी दुबईला गेली होती. आपण दुबई विमानतळावर अडकल्याचं सांगत तिने भारत सरकार, पंतप्रधान मोदींकडे सोशल मीडियावर मदत मागितली आहे.
advertisement
"इथं तणावपूर्ण परिस्थिती आहे, कोणतीही विमानं नाही. जी विमान उड्डाण करणार होती ती रद्द करण्यात आली आहेत. भारतात परत येण्याचे मार्ग बंद झाले आहे. त्यामुळे भारत सरकाराने आम्हाला इथून बाहेर काढावं" अशी विनंती सोनम चौहानने केली आहे.
Location :
Delhi
First Published :
Mar 01, 2026 11:02 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
दुबईत भारतीय अभिनेत्याच्या घराजवळ Missile! धमाक्यांनी हादरलं संपूर्ण घर; भयावह VIDEO









