advertisement

US-इस्त्रायल खामेनेईच्या जीवावर का उठले? कशाची होती भीती अन् का पुकारावं लागलं युद्ध? संघर्षाची A to Z स्टोरी

Last Updated:

शनिवारी सकाळी अमेरिकन आणि इस्रायली फौजांनी इराणच्या लष्करी तळांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर भीषण हल्ले केले आहेत. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे.

News18
News18
इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता एका अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. शनिवारी सकाळी अमेरिकन आणि इस्रायली फौजांनी इराणच्या लष्करी तळांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर भीषण हल्ले केले आहेत. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुबातील काही लोक देखील मारले गेले आहेत. या हल्ल्यांमुळे संपूर्ण आखाती देशांत तणावाचे वातावरण आहे. पण इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई इस्रायल अमेरिकेच्या निशाण्यावर का होते? त्यांना खामेनेई पासून कसला धोका होता? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आणि इराणमध्ये सध्या काय घडतंय...

प्रश्न १: शनिवारी नेमके कोठे हल्ले झाले आणि त्याचे स्वरूप काय होते?

उत्तर: इराणमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इस्रायलने इराणची राजधानी तेहरानसह देशातील अनेक भागांना लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे, तेहरानच्या उत्तरेकडील 'शेमिरान' भागात, जिथे इराणचे राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचे निवासस्थान (कंपाउंड) आहे, तिथे क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त खामेनेई यांच्या कार्यालयांवरही हल्ले करण्यात आले. खामेनेई यांच्या निवासस्थानावर एकाच वेळी ३० बॉम्ब टाकल्याची माहिती आहे.
advertisement

प्रश्न २: इराणच्या सत्ताव्यवस्थेत खामेनी यांचे स्थान काय आहे?

उत्तर: ८६ वर्षीय अयातुल्ला खामेनेई हे केवळ इराणचे नेते नसून ते 'सुप्रीम लीडर' आहेत. १९७९ च्या क्रांतीचे प्रणेते अयातुल्ला खोमेनी यांच्यानंतर १९८९ पासून खामेनेई यांनी इराणची धुरा सांभाळली. इराणमधील सरकार, सैन्य, न्यायव्यवस्था आणि धार्मिक बाबींवर त्यांचाच अंतिम शब्द असतो. गेल्या तीन दशकांपासून त्यांनी अमेरिकेला इराणचा "क्रमांक १ शत्रू" मानले असून, पाश्चात्य देशांशी त्यांचा संघर्ष कायम राहिला आहे.
advertisement

प्रश्न ३: त्यांच्या सत्तेचा मुख्य आधार कोणता आहे?

उत्तर: खामेनेई यांची सत्ता टिकवून ठेवण्यात दोन प्रमुख यंत्रणांचा मोठा वाटा आहे. पहिली म्हणजे 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) आणि दुसरी 'बसीज' (Basij) ही निमलष्करी संघटना. या दोन्ही संघटना खामेनी यांच्याशी अत्यंत एकनिष्ठ आहेत आणि त्यांच्याकडे लाखो स्वयंसेवकांचे बळ आहे. या दोन संघटनांच्या जीवावरच त्यांनी इतके वर्षे इराणवर सत्ता राखली.
advertisement

प्रश्न ४: इराणच्या अणुकार्यक्रमाबद्दल खामेनेईंची भूमिका काय?

उत्तर: खामेनेई नेहमीच असा दावा करत आले आहेत की, इराण कधीही अण्वस्त्र बनवणार नाही आणि त्यांचा अणुकार्यक्रम हा केवळ वीजनिर्मिती किंवा नागरी उपयोगासाठी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या तपासणीतही अद्याप अण्वस्त्र निर्मितीचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र, इस्रायल आणि ट्रम्प प्रशासनाचा असा ठाम विश्वास होता की इराण लपून-छपून अण्वस्त्रे बनवण्याची तयारी करत आहे. याला सगळा सपोर्ट हा खामेनेई यांचा आहे. इराण अण्वस्त्र देश बनला तर याचा सगळ्यात जास्त धोका अमेरिका आणि इस्त्रायलला होता. याच कारणामुळे दोन्ही देश खामेनेईंच्या जीवावर उठले.
advertisement

प्रश्न ५: अमेरिका-इस्त्रायलने खामेनेईंना कसं मारलं?

अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी (२८ फेब्रुवारी) इराणवर मोठा हल्ला केला. या मोहिमेला इस्रायलने 'रोअरिंग लायन' (Roaring Lion) आणि अमेरिकेने 'ऑपरेशन एपिक फ्युरी' (Operation Epic Fury) असं नाव दिलं होतं. हा हल्ला थेट तेहरानमधील खामेनेई यांच्या निवासस्थानासह एकूण ३० ठिकाणी करण्यात आला. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी खामेनेई हे त्यांच्या वरिष्ठ सल्लागारांसोबत हेड क्वार्टरमध्ये बैठक घेत होते. त्याच वेळी हा स्ट्राइक करण्यात आला.
advertisement
डझनभर इस्रायली फायटर जेट्सनी इराणमधील अनेक ठिकाणांवर बॉम्बफेक केली. यामध्ये खामेनेई यांच्या घरासोबतच इराणची हवाई संरक्षण यंत्रणा आणि क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य करण्यात आलं. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, इस्त्रायली लढाऊ विमानांनी खामेनेई यांच्या घरावर एकाच वेळी तब्बल ३० बॉम्ब टाकले. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये खामेनेई यांची मुलगी, जावई, नातू आणि सून यांचा समावेश आहे. या हल्ल्यात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे माजी सचिव अली शामखानी आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) कमांडर मोहम्मद पाकपौर यांच्यासह वरिष्ठ लेफ्टनंट मारले गेले.
advertisement

प्रश्न ६: इस्रायल आणि अमेरिकेने खामेनेईंबद्दल काय इशारे दिले होते?

उत्तर: या संघर्षात इस्रायलने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं होतं की, "खामेनेईंसारख्या हुकूमशहाचे अस्तित्व आता राहू शकत नाही." तर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी खामेनेईंना हटवल्यास हा दीर्घकाळ चाललेला संघर्ष संपुष्टात येईल, असे संकेत दिले होते.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
US-इस्त्रायल खामेनेईच्या जीवावर का उठले? कशाची होती भीती अन् का पुकारावं लागलं युद्ध? संघर्षाची A to Z स्टोरी
Next Article
advertisement
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement