India Pakistan: जगाचं लक्ष इराण युद्धाकडे, अन् पाकिस्तानचा सीमेवर डाव! पुंछमध्ये भारताने पाकड्यांचे ड्रोन पिटाळले
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
India Pakistan : जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तानच्या नापाक कुरापती पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. रविवारी पहाटे पुंछ जिल्ह्यात एका पाकिस्तानी ड्रोनने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.
श्रीनगर: जगाचे लक्ष अमेरिका-इस्राएल आणि इराण युद्धाकडे लागले असताना दुसरीकडे पाकिस्तानची सीमाभागात आगळीक सुरू आहे. भारतीय जवानांनी प्रत्यक्ष नित्रंयण रेषेवर पाकिस्तानचे नापाक इरादे हाणून पाडले. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तानच्या नापाक कुरापती पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. रविवारी पहाटे पुंछ जिल्ह्यात एका पाकिस्तानी ड्रोनने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क भारतीय जवानांनी तत्परतेने गोळीबार केल्यामुळे या ड्रोनला माघार घ्यावी लागली. गेल्या तीन दिवसांतील घुसखोरीचा हा दुसरा प्रयत्न असल्याने सीमाभागात तणाव वाढला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ६ वाजून १० मिनिटांच्या सुमारास पुंछमधील दिगवार सेक्टरमध्ये सीमेवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांना एक संशयास्पद ड्रोन घिरट्या घालताना दिसले. हे ड्रोन पाकिस्तानच्या बाजूने भारतीय हद्दीत शिरले होते. धोका ओळखून जवानांनी या ड्रोनला पाडण्यासाठी तत्काळ डझनभर फैरी झाडल्या. जवानांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे ड्रोन काही वेळ घिरट्या घालून पुन्हा पाकव्याप्त काश्मीरच्या (PoK) दिशेने पसार झाले.
advertisement
तीन दिवसांत दुसरी घटना
विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानी ड्रोनने घुसखोरी करण्याचा हा दुसरा प्रयत्न आहे. यापूर्वी २७ फेब्रुवारी रोजी देखील याच भागात एका पाकिस्तानी ड्रोनने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यावर भारतीय सैन्याने गोळीबार केला होता. वारंवार होणाऱ्या या हालचालींमुळे भारतीय लष्कराने या भागात कडक पाळत ठेवली आहे.
advertisement
मोठी शोधमोहीम सुरू
ड्रोन परत गेले असले तरी, त्यातून शस्त्रास्त्रे किंवा अंमली पदार्थांची (नार्कोटिक्स) तस्करी झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही शक्यता लक्षात घेऊन भारतीय लष्कराने दिगवार आणि आजूबाजूच्या परिसरात मोठी शोधमोहीम (Search Operation) सुरू केली आहे. सीमेवरील प्रत्येक हालचालीवर जवान नजर ठेवून असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Mar 01, 2026 10:53 AM IST
मराठी बातम्या/देश/
India Pakistan: जगाचं लक्ष इराण युद्धाकडे, अन् पाकिस्तानचा सीमेवर डाव! पुंछमध्ये भारताने पाकड्यांचे ड्रोन पिटाळले









