सांगलीकरांनो सावधान! पाण्यात आढळले खतरनाक बॅक्टेरिया; दक्षता घ्या, अन्यथा होतील 'हे' भयंकर आजार
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Sangali News: शहरातील सत्यसाईनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले. ते पाणी दूषित असल्याचे आढळले आहे. या पाण्यात...
Sangali News: शहरातील सत्यसाईनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले. ते पाणी दूषित असल्याचे आढळले आहे. या पाण्यात काॅलिफाॅर्म जीवणू (बॅक्टेरिया) आहेत. त्यांचे संख्या 16 पेक्षा जास्त आहे. इतकंच नाहीतर ई-कोलाई हा जीवाणूही आढळून आलेला आहे. या दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, कावीळ यांसारखं आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ताबडतोब उपाय योजना करावी, अशी मागणी होत आहे.
पाणी दूषित असल्याचं कसं कळलं?
सत्यसाईनगरमधील एक व्यक्ती रक्तदान शिबिरात गेला होता. तेव्हा त्याला हिपॅटायटीस-बी पाॅझिटिव्ह असल्याचं कळलं. त्यानंतर एका खासगी लॅब ब्लड टेस्ट केली, तर तिथेही हेच निदान झालं. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबाने घरातील पिण्याचं पाणी प्रयोगशाळेत तपासलं, तेव्हा त्यात काॅलिफाॅर्म आणि ई-कोलाई आढळून आले. त्यामुळे या भागातील पाणी दूषित असल्याचं स्पष्ट झालं.
advertisement
हे जीवाणू पाण्यात येतात कुठून?
मानवी आणि प्राण्यांच्या मलमूत्रातून कॉलिफॉर्म हे जीवाणू पाण्यात येतात. या जीवाणुंमुळे मानवी आरोग्य बिघडलं. जुलाब, उलटी, पोटदुखी, कावीळ असे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे सत्यसाईनगरात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने, तसेच आरोग्य विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने संबंधित व्यक्तीच्या घरातून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
advertisement
हे ही वाचा : Kolhapur News: गणेशोत्सव करावा की, टँकरमागे पळावं? कोल्हापूरात पाण्याची बोंबाबोंब; प्रशासन करतंय काय?
हे ही वाचा : रेल्वे प्रवाशांनो, इकडे लक्ष द्या! प्रवासात 'लगेज'साठीही मोजावे लागणार पैसे, नियमभंग झाल्यास होणार 'इतका' दंड
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 28, 2025 2:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सांगलीकरांनो सावधान! पाण्यात आढळले खतरनाक बॅक्टेरिया; दक्षता घ्या, अन्यथा होतील 'हे' भयंकर आजार


