Sanjay Raut: भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण जाहीर; संजय राऊत भडकले, म्हणाले महाराष्ट्राचा अपमान...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च पुरस्कार मानले जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.
भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्रातील कारकीर्द प्रचंड वादग्रस्त ठरली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे ते टिकेचे धनी झाले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली होती. मुंबई, महाराष्ट्र, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले इत्यादींवर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. तसंच, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना, राज्यपाल कोश्यारींवर ‘समांतर सरकार चालवत असल्याचाही आरोप झाला होता.
advertisement
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला. संजया राऊत म्हणाले, महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता. महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान!
advertisement
महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले
याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता!
महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते!
छान! pic.twitter.com/5xrZ0u6c9q
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 25, 2026
advertisement
कोण आहेत भगतसिंग कोश्यारी?
1 सप्टेंबर 2019 पासून भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा खांद्यावर घेतली. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भगत सिंग कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली. भगत सिंग कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला. कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असून भाजपच्या वरिष्ठ फळीतील नेते आहेत. आणीबाणीच्या काळात 1977 मध्ये त्यांनी तुरुंगवारीही भोगली आहे. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 2001-2002 या काळात ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. 2002 ते 2007 या काळात उत्तराखंड विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी त्यांची वर्णी लागली होती. 2008 ते 2014 या काळात ते राज्यसभेचे खासदार होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 9:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut: भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण जाहीर; संजय राऊत भडकले, म्हणाले महाराष्ट्राचा अपमान...









