Hardik Pandya : मॅचच्या तिसऱ्याच बॉलला मैदानात ड्रामा, बोटं मोडणाऱ्यांना हार्दिकने केलं गपगार, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टी-20 सीरिजच्या तिसऱ्या सामन्यात मैदानात मोठा ड्रामा पाहायला मिळाला.
गुवाहाटी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टी-20 सीरिजच्या तिसऱ्या सामन्यात मैदानात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. सीरिजमध्ये 2-0 ने आघाडीवर असणाऱ्या भारताने टीममध्ये 2 बदल केले. वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग यांना या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली, त्यांच्याऐवजी रवी बिष्णोई आणि जसप्रीत बुमराह यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला. दुसऱ्या टी-20 सामन्यात बुमराहला विश्रांती देण्यात आली होती, तर रवी बिष्णोईचा सीरिजमधला हा पहिलाच सामना आहे.
टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्याच बॉलला न्यूझीलंडला धक्का दिला. हर्षित राणाच्या बॉलिंगवर डेवॉन कॉनवे मिड-ऑफच्या वरून मोठा शॉट मारायला गेला, पण हार्दिक पांड्याने त्याचा उत्कृष्ट कॅच पकडला.
हार्दिक पांड्याने दुखापतीनंतर टीम इंडियामध्ये कमबॅक केलं आहे. याआधीही हार्दिकला अनेकदा दुखापतींमुळे मोठ्या स्पर्धांना मुकावं लागलं आहे, त्यामुळे अनेकदा हार्दिकच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतं. आता टी-20 वर्ल्ड कपच्या आधी हार्दिकने त्याच्या चपळ फिल्डिंगने स्वत:चा फिटनेस दाखवून दिला आहे.
advertisement
WOW!
How about that for a catch from Hardik Pandya
Wicket in the opening over for Harshit Rana
Updates https://t.co/YzRfqi0li2#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/vFBWKCB2ze
— BCCI (@BCCI) January 25, 2026
advertisement
राणाने पाचव्यांदा घेतली कॉनवेची विकेट
हर्षित राणाने या दौऱ्यात पाच सामने खेळले आहेत, ज्यात त्याने पाचही वेळा डेवॉन कॉनवेची विकेट घेतली आहे. तीनही वनडे सामने आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 मध्ये हर्षित राणाने कॉनवेला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
न्यूझीलंडची बॅटिंग गडगडली
या सामन्यात न्यूझीलंडची बॅटिंग पुन्हा एकदा गडगडली आहे. 20 ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा स्कोअर 153/9 एवढा झाला. जसप्रीत बुमराहने 4 ओव्हरमध्ये फक्त 17 रन देऊन सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि रवी बिष्णोई यांना 2-2 विकेट मिळाल्या. हर्षित राणाला एक विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 48 रन केले, याशिवाय मार्क चॅपमनने 32 आणि कर्णधार मिचेल सॅन्टनरने 27 रनची खेळी केली.
Location :
Guwahati [Gauhati],Kamrup Metropolitan,Assam
First Published :
Jan 25, 2026 8:44 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Hardik Pandya : मॅचच्या तिसऱ्याच बॉलला मैदानात ड्रामा, बोटं मोडणाऱ्यांना हार्दिकने केलं गपगार, Video










