मुलीमुळं अडकला! खरातशी संगत भोवली, मुंबईच्या बड्या अधिकाऱ्याची रातोरात उचलबांगडी, नेमकं कनेक्शन काय?
- Published by:Prachi Amale
- Reported by:PRANALI KAPASE
Last Updated:
मुंबईतल्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
नाशिक : नाशिकच्या भोंदू अशोक खरातच्या पापकर्माचा विळखा आता मंत्रालयातील वातानुकूलित दालनांपर्यंत पोहोचला आहे. राजकीय नेत्यांनंतर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांचे 'कनेक्शन' उघड होऊ लागल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. खरातशी जवळचे संबंध असल्याच्या संशयावरून मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (SRA) उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शेकडो महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधींच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप असलेल्या अशोक खरात प्रकरणाने आता राज्य प्रशासनाला हादरवून सोडले आहे. राजकीय नेत्यांचे फोटो समोर आल्यानंतर आता भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांची साखळी उघड होत आहे. 'एसआरए'चे उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांचे खरातशी आर्थिक लागेबांधे असल्याचे समोर येताच सरकारने त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांची बदली केली आहे. या कारवाईमुळे मंत्रालयातील खरात समर्थक अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
advertisement
अधिकाऱ्यावर काय आहेत आरोप?
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, अभिजीत भांडे पाटील यांचे अशोक खरातशी अत्यंत घनिष्ठ संबंध होते. खरातची पत्नी आणि मुलगी यांच्या नावे असलेल्या अनेक जमिनींच्या व्यवहारात भांडे पाटील यांनी मोठी गुंतवणूक केल्याचा संशय आहे. महसूल विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत असताना खरातच्या अवैध कामांना प्रशासकीय संरक्षण देणे आणि त्याच्या आर्थिक साम्राज्यात वाटेकरी होणे, असे गंभीर आरोप या अधिकाऱ्यावर होत आहेत.
advertisement
आता पुढचा नंबर कोणाचा?
या प्रकरणाची व्याप्ती इतकी मोठी आहे की, यापूर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. चाकणकर या खरातशी संबंधित एका ट्रस्टच्या संचालिका होत्या. आता उपजिल्हाधिकाऱ्यांवर झालेल्या या कारवाईमुळे हे प्रकरण केवळ एका भोंदू बाबापुरते मर्यादित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement
अनेक अधिकारी पोलीस यंत्रणेच्या रडारवर
अभिजीत भांडे पाटील यांची बदली ही केवळ सुरुवात मानली जात आहे. खरातच्या संपर्कात असलेल्या इतरही काही अधिकाऱ्यांची यादी आता सीआयडी आणि पोलीस यंत्रणेच्या रडारवर आहे. भोंदू खरातच्या चरणी लोटांगण घालणाऱ्या प्रत्येक भ्रष्ट अधिकाऱ्याचा बुरखा फाडला जाईल असे संकेत गृहविभागाकडून मिळत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 4:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुलीमुळं अडकला! खरातशी संगत भोवली, मुंबईच्या बड्या अधिकाऱ्याची रातोरात उचलबांगडी, नेमकं कनेक्शन काय?






