पंकजा मुंडे vs सुरेश धस यांच्यातील संघर्ष पेटला, भाजपला फटका, पदाधिकाऱ्यांच्या निवडी रखडल्या

Last Updated:

गत काही महिन्यांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यात सुप्त संघर्ष पाहायला मिळतोय.

पंकजा मुंडे आणि सुरेश धस
पंकजा मुंडे आणि सुरेश धस
सुरेश जाधव, बीड : बीड जिल्ह्यात भाजपाच्या तालुकाध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. नव्याने निवड झालेल्या या पदाधिकाऱ्यांचा सत्कार परळी येथे पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. परंतु आष्टी मतदारसंघातील आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी मात्र अद्याप झालेल्या नाहीत.
गत काही दिवसात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यात सुप्त संघर्ष पाहायला मिळतोय. या संघर्षामुळेच या निवडी देखील लांबल्याची चर्चा आहे. आजवर बीड जिल्ह्यातील भाजपमध्ये पंकजा मुंडे यांचा शब्द अंतिम असायचा. परंतु प्रथमच आमदार सुरेश धस यांनी थेट त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने आता पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील रखडल्या आहेत.
advertisement

भाजपला फटका, पदाधिकाऱ्यांच्या निवडी रखडल्या

पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये मुंडे आणि धस यांच्यात कोण बाजी मारतो? यावरूनच पक्ष नेमका कोणाच्या पाठीशी आहे हे देखील स्पष्ट होऊ शकणार आहे. मात्र तूर्त पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील कलगीतुरा बीडसह राज्यातील राजकीय वर्तुळातही विशेष चर्चेत आहे.
बीड जिल्ह्यात भाजपाचे 24 मंडळ अध्यक्ष जाहीर होणार आहेत. त्यापैकी 20 मंडळ अध्यक्षांची निवड जाहीर झाली आहे. आष्टी मतदारसंघात तांत्रिक अडचणींमुळे ही निवड अद्याप झाली नाही. लोकनेत्या पंकजा मुंडे आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी लवकरच जाहीर होतील, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी सांगितले आहे.
advertisement

सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यात संघर्ष का सुरू आहे?

पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचा मी अधिकृत उमेदवार असतानाही माझ्याविरोधात अपक्ष उमेदवार उभा केला. संबंधित उमेदवारासाठी काम करण्याच्या सूचना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यांचे हे वर्तन पक्षविरोधी असल्याचे जाहीरपणे निवडणूक निकालानंतर सुरेश धस यांनी सांगितले. त्यानंतर असे कुठलेही कृत्य मी केले नसल्याचा पलटवार पंकजा मुंडे यांनी केला. तसेच देशमुख हत्या प्रकरणातही सुरेश धस यांनी मुंडे बहीण भावाला जोरदार लक्ष्य केले. विधानसभा निवडणूक निकालानंतर धस-मुंडे यांच्यातील दुरावा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पंकजा मुंडे vs सुरेश धस यांच्यातील संघर्ष पेटला, भाजपला फटका, पदाधिकाऱ्यांच्या निवडी रखडल्या
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement