advertisement

भाजपने एकाच दगडात मारले 2 पक्षी! शिरसाट शुन्यावर आऊट तर सत्तारांचा गडही गेला, सेनेचा गेम कसा झाला?

Last Updated:

 छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचे 23 सदस्य निवडून आले

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: राज्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ नगरपंचायत समिती निवडणुकीसाठी मतमोजणी आता जवळपास पूर्ण झाली आहे. राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजप मोठा पक्ष ठरला आहे. पण, या निवडणुकीमध्ये  शिंदे सेनेच्या आजी-माजी पालकमंत्र्यांना मोठे धक्के बसले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत पालकमंत्र्यांनाच आपल्या मतदारसंघात एकही जागा राखता आली नाही. विशेष म्हणजे, पालिका निवडणुकीमध्ये पराभवानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेना फेल ठरली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचे 23 सदस्य निवडून आले आहे तर शिवसेना शिंदे गटाचे 21 सदस्य निवडून आले आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या मतदारसंघात भाजप आणि ठाकरे सेनेला प्रत्येकी दोन- दोन जागा मिळाल्या पालकमंत्र्यांना मात्र भोपळा फोडला गेला नाही.
advertisement
सिल्लोडमध्ये मोठा उलटफेर
त्यासोबतच पंचायत समितीच्या 9 पैकी 6 पंचायत समित्यांवर भाजपाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे तर 3 ठिकाणी शिंदे गटाचे वर्चस्व आहे. यामध्ये सिल्लोड सोयगाव मतदारसंघात या अगोदर एक हाती सत्ता घेणाऱ्या अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसला आहे.  भाजपने सत्तारांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे.
सिल्लोड सोयगाव पंचायत समितीवर भाजपने वर्चस्व स्थापन केलं आहे. जागावाटपापासून भाजपने अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामध्ये युती करण्यात नकार दिलाा होता. त्यामुळे सिल्लोडमध्ये मैत्रीपूर्ण किंवा समोरासमोर लढू असं भाजपने ठणकावून सांगितलं होतं. तर सत्तार यांनीही भाजपसोबत युती नको अशी ठाम भूमिका घेतली होती. पण आता निकालाअंती सिल्लोड पंचायत समिती भाजपने ताब्यात घेतली आहे.  18 पैकी भाजपकडे 10 सदस्य तर शिंदे सेनेला 8 सदस्य आहे.  या अगोदर आमदार अब्दुल सत्तार यांचं इथं वर्चस्व होतं. पण आता भाजपने इथं मुसंडी मारली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर गट निकाल
भाजप : 23 + 2 पुरस्कृत
शिवसेना शिंदे : 21 + 1 पुरस्कृत
शिवसेना UBT: 09
NCP AP : 04
NCP SP : 01
काँग्रेस : 01
अपक्ष : 01
छत्रपती संभाजीनगर (१०)
निकाल - भाजप : 04 | शिवसेना : 02 | शिवसेना UBT: 02 | अपक्ष : 2
advertisement
१)लाडसावंगी - राधाकिशन पठाडे - शिवसेना शिंदे
२)गोलटगाव - ज्योती शिंदे - अपक्ष
३)करमाड - साधना कुलकर्णी - BJP
४)सावंगी - अजिनाथ धामणे - BJP
५)दौलताबाद - लंकाबाई जाधव - BJP
६)वडगाव (को.) उत्तरपूर्व - ललिता सोनवणे - शिवसेना ठाकरे
७)वडगाव (को.) मध्यपश्चिम - सचिन गरड - अपक्ष (BJP पुरस्कृत)
advertisement
८)पंढरपूर - विद्या गायकवाड - शिवसेना ठाकरे
९)आडगाव बु. - विजय घोडके - शिवसेना शिंदे
१०)पिंप्री बु. - जयश्री पवार - BJP
----------------------------
पैठण तालुका (९)
निकाल - शिवसेना : 08 | शिवसेना UBT: 01 | BJP : 00
१)चितेगाव - कृष्णा गिधाने - शिवसेना शिंदे
२)बिडकीन - मनोज पेरे - शिवसेना ठाकरे
advertisement
३)आडूळ बु. - रुपाली तवार - शिवसेना शिंदे
४)पाचोड बु. - शिवराज भूमरे - शिवसेना शिंदे
५)दावरवाडी - जयश्री वाघमोडे - शिवसेना शिंदे
६)ढोरकिन - राधिका जगताप - शिवसेना शिंदे
७)पिंपळवाडी - कारभारी लोहकरे - शिवसेना शिंदे
८)विहामांडवा - नितीन तांबे - शिवसेना शिंदे
९)नवगाव - पांडुरंग औटे - शिवसेना शिंदे
----------------------------
गंगापूर तालुका (९)
निकाल - भाजप : 04 | शिवसेना : 01 | शिवसेना UBT: 01 | NCP AP: 02 | अपक्ष : 01
१)सावंगी - संगीता अमराव - BJP
२)अंबेलोहळ - रतन बत्तीसे - BJP
३)रांजणगाव शे.पुं. - अमोल लोहकरे - BJP
४)वाळूज बु. - बालाजी सोनटक्के - NCP AP
५)तुर्काबाद - स्वाती पाटेकर - शिवसेना शिंदे
६)शिल्लेगाव - सविता जाधव - BJP
७)नेवरगाव - वैजयंती शिरसाठ - NCP AP
८)जामगाव - दीपा मुंदडा - अपक्ष (भाजप पुरस्कृत)
९)शेंदूरवादा - कृष्णा साहेबराव पाटील - शिवसेना ठाकरे
----------------------------
वैजापूर तालुका (८)
निकाल - भाजप : 01 | शिवसेना शिंदे : 03 | शिवसेना UBT: 02 | NCP AP: 01
१)वाकला - पार्वतीबाई जाधव - अपक्ष (शिवसेना शिंदे पुरस्कृत)
२)बोरसर - कल्याण गायके - शिवसेना ठाकरे
३)शिवूर - संजय निकम - शिवसेना ठाकरे
४)सवंदगाव - निताताई राजपूत - शिवसेना शिंदे
५)लासूरगाव - संगीता तांबे - शिवसेना शिंदे
६)घायगाव - श्रीराम गायकवाड - शिवसेना शिंदे
७)वांजरगाव - पंकज ठोंबरे - NCP AP
८)महालगाव - अविनाश गलांडे - BJP
----------------------------
कन्नड तालुका (८)
निकाल - भाजप : 03 | शिवसेना शिंदे : 01 | शिवसेना UBT: 02 | NCP AP: 01 | काँग्रेस : 01
१)नागद - तृप्ती राजपूत - काँग्रेस
२)करंजखेडा - अर्जुन पाटील - NCP AP
३)चिंचोली लिंबाजी - रावसाहेब पवार - शिवसेना शिंदे
४)पिशोर - केतन काजे - शिवसेना ठाकरे
५)कुंजखेडा - सुनंदा चव्हाण, शिवसेना ठाकरे
६)हतनूर - मीनाक्षी पवार - BJP
७)जेहूर - मंजुषा मलदोडे - BJP
८)देवगाव रंगारी - डॉ. संजय गव्हाणे - BJP
----------------------------
खुलताबाद तालुका (३)
निकाल - भाजप : 03
१)बाजारसावंगी - प्रतीक्षा कापसे - BJP
२)गदाना - रेखा चव्हाण - BJP
३)वेरूळ - कुणाल दांडगे - BJP
----------------------------
फुलंब्री तालुका (4 गट) : भाजप : 03 | NCP SP : 01
१)बाबरा - जितेंद्र जयस्वाल - BJP
२)वडोद बाजार - गोपाळ वाघ - BJP
३)पाल - गीतांजली पाथ्रीकर - NCP SP
४)गणोरी - निखिल चव्हाण - BJP
----------------------------
सिल्लोड तालुका (९)
निकाल - भाजप : 03 | शिवसेना शिंदे : 06
१)अजिंठा - आयेशाबेगम सय्यद नासेरहुसेन - शिवसेना शिंदे
२)शिवना - निकिता काळे - शिवसेना शिंदे
३)उंडणगाव - सचिन वाघ - BJP
४)अंभई - अब्दुल आमेर अब्दुल सत्तार - शिवसेना शिंदे
५)घाटनांद्रा - आशा गाढे - शिवसेना शिंदे
६)डोंगरगाव - देविदास पालोदकर - शिवसेना शिंदे
७)भराडी - राधाकृष्ण काकडे - BJP
८)अंधारी - मंगल तायडे - शिवसेना शिंदे
९)केन्हाळा - अनिता मोठे - BJP
----------------------------
सोयगाव तालुका (३) :
निकाल - भाजप : 02 | शिवसेना UBT: 01
१)फर्दापूर - मुलतानी माहिन इद्रिस - BJP
२)आमखेडा - पुष्पाबाई काळे - BJP
३)गोंदेगाव - सुनीता चव्हाण - शिवसेना ठाकरे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपने एकाच दगडात मारले 2 पक्षी! शिरसाट शुन्यावर आऊट तर सत्तारांचा गडही गेला, सेनेचा गेम कसा झाला?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement