advertisement

ठरलं! शिंदेसेनेचा महापौर असलेल्या पालिकेत सव्वा वर्षांनी भाजपचा महापौर, पण मुंबईत मात्र वेगळं गणित!

Last Updated:

कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि उल्हास नगरमध्ये सव्वा वर्षांनंतर भाजपचा महापौर बसणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस
मुंबई : महापालिका निवडणूक निकालानंतर बहुतांश ठिकाणी महापौरपदाची निवडणूक संपन्न झाली असून केवळ भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाची निवड बाकी आहे. चंद्रपूरचा अपवाद वगळता सत्तेतील मित्रपक्षांनी सबुरीने घेऊन मित्रपक्षांशीच सत्तास्थापन केली आहे. अशावेळी शिंदेसेना-भाजपने चर्चेअंती महापौरपदाच्या सत्तावाटपाचे सूत्र ठरवले आहे.
कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि उल्हास नगरमध्ये सव्वा वर्षांनंतर भाजपचा महापौर बसणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. महायुतीच्या बैठकीत हा फॉर्म्युला ठरल्याची माहितीही मिळते आहे.

मुंबईत पाचही वर्ष भाजपचा महापौर बसणार

दुसरीकडे मुंबईत मात्र पाचही वर्ष भाजपचा महापौर असेल, असे सूत्रांनी सांगितले. मुंबईत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून सत्तावाटपाचे सूत्र ठरवताना उपमहापौरपद शिवसेनेकडे देण्यास भाजपने सहमती दर्शवली. मात्र पुढील पाचही वर्षे भारतीय जनता पक्षाचाच महापौर मुंबईत बसेल, असे सूत्रांनी सांगितले.
advertisement

सव्वा वर्षांचे महापौरपद शिवसेनेला मिळणार, शिवसेना सूत्रांचा दावा

दुसरीकडे शिवसेनेच्या सूत्रांनी या वृत्तांचे खंडन केले. मुंबई महापालिकेत शिवसेनेला सव्वा वर्षासाठी महापौर पद मिळणार असल्याचा त्यांचा दावा आहे. एकूण ५ वर्षांपैकी सव्वा वर्ष शिवसेनेचा महापौर असेल मात्र हा महापौर पहिल्या अडीच वर्षात असण्याची शक्यता नाही, दुसऱ्या टप्प्यातील अडीच वर्षांत शिवसेनेचा महापौर असेल अशी सूत्रांची माहिती आहे. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांमधे याबाबतीत चर्चा झाली असल्याचेही शिवसेना सूत्रांचे म्हणणे आहे.
advertisement

मुंबईत महापालिकेत कोणत्या समितीवर कोण?

बृहन्मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजेश्री शिरवडकर, सुधार समिती अध्यक्षपदासाठी संध्या दोशी (सक्रे), बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) समिती अध्यक्षपदासाठी श्रीमती तृष्णा विश्वासराव यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना ठाकरे पक्षाने उमेदवारी अर्ज न भरल्याने आज त्यांची बिनविरोध झाली.
advertisement

मुंबईत कोणत्या पक्षाच्या किती जागा?

भाजप ८९ जागा
शिंदेसेना-२९
अजित पवार राष्ट्रवादी-३
काँग्रेस २४
शिवसेना ६५
मनसे ६
एमआयएम ८
अपक्ष २
इतर पक्ष २
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठरलं! शिंदेसेनेचा महापौर असलेल्या पालिकेत सव्वा वर्षांनी भाजपचा महापौर, पण मुंबईत मात्र वेगळं गणित!
Next Article
advertisement
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा; टोलचे दर आयुष्यभर विसरणार नाही
भारतातील 5 सर्वात महागडे टोल नाके; इथून गाडी नेली तर खिसा रिकामाच समजा
  • देशातील 5 महागडे टोल पॉइंट

  • 2 टोल नाके महाराष्ट्रात

  • टोलचे दर ऐकून फुटेल घाम

View All
advertisement