Buldhana Crime : बुलढाण्यात शॉर्टकट श्रीमंत होण्याचा हव्यास नडला; 4 तरुणांना अटक, कसा होता ट्रॅप?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Buldhana Crime : 2 लाखाचे 4 लाख करून देण्याचा प्रयत्न करण्याच्या बेतात असलेल्या 4 तरुणांना नकली नोटांसह अटक करण्यात यश आलं आहे.
बुलढाणा, (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यात रातोरात श्रीमंत होण्याचा मोह चार जणांना चांगलाच महागात पडला आहे. दोन लाखाच्या बदल्यात चार लाखांच्या नकली नोटा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात टेंभुर्णा बायपास वर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावरून पोलिसांनी सापळा रचून टेंभुर्णा नाक्यावर टाटा हॅरिअर नावाच्या गाडीतून नकली नोटा घेऊन जाणाऱ्या खामगाव शहरातील चौघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे चौघेजण दोन लाखाच्या मोबदल्यात चार लाख रुपये देण्याचे आमिष देऊन फसवणुकीच्या तयारीत होते. मात्र, वेळीच पोलिसांनी या चौघांना रंगेहाथ पकडून अटक केली आहे. हे चौघेही आरोपी खामगाव शहरातील रहिवासी असून यामध्ये सचिन भास्कर दुतोंडे (वय 34,राहणार बर्डे प्लॉट) मयूर किशोर सिद्धपुरा (वय 34), विलास बाबुराव ठाकरे (वय 38), लखन गोपाल बजाज (वय 33 वर्ष सर्व राहणार अभय नगर दंडे स्वामी मंदिराजवळ घाटपुरी नाका) यांचा समावेश आहे. या चौघांकडून एक टाटा हरिअर कार आणि भारतीय बच्चो का बँक असे लिहिलेल्या पाचशेच्या सहा हजार शंभर नोटा, खऱ्या 500 च्या 849 नोटा आणि सहा अँड्रॉइड फोन जप्त केले आहेत. गुन्हा करण्याच्या उद्देशाने या चौघांनी कारला बनावट नंबर प्लेट देखील लावली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
advertisement
यापूर्वीही महाराष्ट्रात बनावट नोटांचं रॅकेट उघड
view commentsदोन महिन्यांपूर्वी एनआयएने महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील राहुल तानाजी पाटील उर्फ जावेद आणि शिवा पाटील भीमराव, उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील विवेक ठाकूर उर्फ आदित्य सिंग, कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील महेंद्र यांच्या घरांवरही छापे टाकले होते. राहुल तानाजी पाटील बनावट पत्त्याचे सिमकार्ड वापरून बनावट नोटा पुरवत असल्याचे तपासात उघड झाले होते. आता पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यात बनावट नोटांचे रॅकेट सापडल्याने खळबळ उडाली आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
January 28, 2024 5:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana Crime : बुलढाण्यात शॉर्टकट श्रीमंत होण्याचा हव्यास नडला; 4 तरुणांना अटक, कसा होता ट्रॅप?


