Buldhana Crime News : 8 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; बुलढाणा हादरलं!
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
बुलढाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
बुलढाणा, राहुल खंडारे, प्रतिनिधी : बुलढाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहेत. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आठ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील एका गावात ही हादरवून सोडणारी घटना घडली आहे. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. तिसऱ्या वर्गात शिकत असलेल्या एका 8 वर्षीय चिमुकलीला चॉकलेट साठी 5 रुपये देतो असे आमिष दाखवून आरोपीने तिला आपल्यासोबत नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. राजेश विंचू असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. गावातील काही महिलांनी या मुलीला घेऊन जात असताना राजेशला पाहिले होते.
advertisement
त्यावरून पीडितेच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीनं आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Location :
Buldana,Buldana,Maharashtra
First Published :
Jul 22, 2024 7:17 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana Crime News : 8 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; बुलढाणा हादरलं!









