प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, छ. संभाजीनगरहून दिल्लीसाठी दिवसाला 3 विमानसेवा, पाहा वेळापत्रक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. आता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून दिल्लीसाठी दररोज तीन वेगवेगळ्या वेळात उड्डाणे होतील.
छत्रपती संभाजीनगर: दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. आता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून दिल्लीसाठी दररोज तीन वेगवेगळ्या वेळात उड्डाणे होतील. आतापर्यंत सकाळी आणि संध्याकाळी अशी दोनच उड्डाणे सुरू होती. मात्र, एअर इंडियाने नव्या हिवाळी वेळापत्रकात दुपारच्या सत्रात एक अतिरिक्त सेवा सुरू केली आहे.
26 ऑक्टोबरपासून लागू झालेल्या या हिवाळी वेळापत्रकानुसार 28 मार्च 2026 पर्यंत ही सुविधा कायम राहणार आहे. नव्या सेवेमुळे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तिन्ही वेळात दिल्लीसाठी विमान मिळणार असल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा झाला आहे.
advertisement
रविवारी सुरू झालेल्या या नव्या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी दुपारच्या विमानातून तब्बल 156 प्रवाशांनी दिल्लीचा प्रवास केला. या अतिरिक्त उड्डाणामुळे प्रवासासाठीच्या प्रतीक्षेतही मोठी घट होणार आहे.
विमानतळ प्राधिकरणाकडून आगामी काळात इतर शहरासाठी देखील विमानसेवा वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
दिल्ली उड्डाणांचे वेळापत्रक
एअर इंडिया (सकाळचे उड्डाण) दिल्लीहून सकाळी 6 वाजता टेकऑफ आणि संभाजीनगरात सकाळी 8 वाजता लँडिंग.
advertisement
शहरातून सकाळी 8:40 वाजता टेकऑफ दिल्लीत सकाळी 10:35 वाजता लँडिंग असेल.
एअर इंडिया (दुपारचे उड्डाण)
दिल्लीहून दुपारी 2 वाजता टेकऑफ आणि संभाजीनगरात दुपारी 3:40 वाजता लँडिंग.
शहरातून सायं. 4:30 वाजता टेकऑफ आणि दिल्लीत सायं. 6:20 वाजता लँडिंग असेल.
इंडिगो (संध्याकाळचे उड्डाण)
दिल्लीहून सायं. 4:55 वाजता टेकऑफ असेल आणि संभाजीनगरात सायं. 6:35 वाजता लँडिंग असेल.
advertisement
शहरातून सायं. 7:15 वाजता टेकऑफ आणि दिल्लीत रात्री 9:05 वाजता लँडिंग.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 27, 2025 9:13 AM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, छ. संभाजीनगरहून दिल्लीसाठी दिवसाला 3 विमानसेवा, पाहा वेळापत्रक


