advertisement

लग्नाच्या खर्चावरून बिनसलं, सुनेनं सासूलाच धुतलं, तोंडावर ठोसा अन्..., छ. संभाजीनगरात खळबळ

Last Updated:

मंदा यांचा मुलगा करण आणि सून कोमल यांचा प्रेमविवाह आहे. लग्नामध्ये झालेल्या खर्चाची मागणी वारंवार होत होती.

लग्नाच्या खर्चावरून बिनसलं, सुनेनं सासूलाच धुतलं, दात पडला अन्..., छ. संभाजीनगरात खळबळ
लग्नाच्या खर्चावरून बिनसलं, सुनेनं सासूलाच धुतलं, दात पडला अन्..., छ. संभाजीनगरात खळबळ
छत्रपती संभाजीनगर: लग्नात झालेल्या खर्चावरून बिनसल्याने सूनेने सासू-सासऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये तिच्यासह तिची आई देखील होती. सासूला तोंडावर ठोसा मारल्याने एक दात पडला. ही घटना 17 मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास छ. संभाजीनगरमधील ब्रिजवाडी परिसरात घडली. कोमल करण सुरडकर (22), उमा मिलिंद घोरपडे (40) आणि पायल जावळे (25) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदा परमेश्वर सुरडकर (38) सून आणि तिच्या सहकाऱ्यांविरोधात पोलिसांत धाव घेतली. मंदा यांना दोन मुले असून एकाचे लग्न झाले आहे. तो पत्नीसह वेगळा राहतो. तर मंदा पती आणि लहान मुलासह दुसऱ्या घरात राहतात. सुनेच्या प्रसूतीनंतर मुलगा अधूनमधून घरी येत होता. 17 मार्च रोजी सून कोमल ही आई उमा घोरपडे आणि बहीण पायल जावळे यांच्यासह घरी आली. तसेच घरासमोर उभं राहून शिवीगाळ सुरू केली.
advertisement
सून शिवीगाळ करत असताना मंदा या पती आणि मुलासह घरात होत्या. खाली येण्यास सांगितल्यानंतर मंदा व मुलगा घरातून खाली आले. तेव्हा तिघींनी लग्नाच्या खर्चावरून मारहाण सुरू केली. तसेच शिवीगाळ करत हातानेच मारायला सुरुवात केली.
खोट्या गुन्ह्याची धमकी
मंदा यांचा मुलगा करण आणि सून कोमल यांचा प्रेमविवाह आहे. लग्नामध्ये झालेल्या खर्चाची मागणी वारंवार होत होती. त्यामुळे हा वाद वाढला. सूनेने मारलेल्या ठोशामुळे सासूचा दात पडला. तर सूनेने मुलावर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
लग्नाच्या खर्चावरून बिनसलं, सुनेनं सासूलाच धुतलं, तोंडावर ठोसा अन्..., छ. संभाजीनगरात खळबळ
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement